अश्लील व्हिडीओजची ब्लॅकमेलिंग, भय्यू महाराजांकडून लाखो लुबाडले, व्हाट्सअ‍ॅप चॅटमधून पोलखोल

दिवंगत संत आणि अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या आत्महत्या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

भय्यू महाराज यांना पलक नावाची तरुणी अश्लील व्हिडीओ शेअर करण्याची धमकी देऊन वारंवार त्रास द्यायची. तिच्या त्रासाला कंटाळून भय्यू महाराजांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती उघड झाली आहे. याप्रकरणी भोपाळच्या फॉरेन्सिक टीमने शुक्रवारी (26 नोव्हेंबर) कोर्टात 109 पानी व्हाट्सअ‍ॅप चॅटींग सादर केलं आहे. त्यामध्ये अनेक तथ्य असल्याचा दावा केला जातोय.

फॉरेन्सिक टीमने कोर्टात सादर केलेल्या अहवालात पलक पीयूष जीजू नावाच्या व्यक्तीसोबत चॅटद्वारे संभाषण करते. त्यातून काही तथ्य समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे भय्यू महाराज यांची आत्महत्या हे खूप मोठं षडयंत्र होतं, असं उघड झालं आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी या प्रकरणी आरोपी पलक हिला याआधीच अटक केली आहे. पलकने आश्रमातील दोन सेवकांच्या मदतीने भय्यू महाराजांचा छळ केला. त्यातून त्यांनी आत्महत्या केली, असा दावा आता कोर्टात करण्यात आला आहे. संबंधित प्रकरण हे सध्या कोर्टात न्यायप्रविष्ट आहे.

पोलिसांनी आरोपी पलक हिच्यासह आणखी काहीजणांना अटक केली होती. तसेच सर्व आरोपींचे मोबाईल जप्त करण्यात आले होते. पोलिसांनी अटकेतील सर्व आरोपींच्या मोबाईल चॅटिंगचा डेटा रिकव्हर केला. त्यातून जी माहिती समोर आली ते पाहून पोलीसही चक्रावले. आरोपी चॅटिंग करताना भय्यू महाराज यांचा BM या कोडवर्डने उल्लेख करायचे.

विशेष म्हणजे एका चॅटमध्ये आरोपीने ‘BM ला वेडं करण्यासाठी घरी बसवायचं आहे. त्यासाठी मांत्रिकासोबत 25 लाखांचं डीलदेखील झालंय’, असा उल्लेख केला आहे. तसेच चॅटमध्ये भय्यू महाराजांच्या पत्नी आयुषी आणि मुलगी कुहू हिचा देखील उल्लेख करण्यात आलेला आहे.

आरोपींच्या मोबाईल चॅटिंगमधील ठळक भाग:

पलक : …आयुषीने मोठा मांत्रिक पकडला आहे. 25 लाखांचं डीलही झालंय.

पीयूष जीजू : कुणासोबत?

पलक : मांत्रिकासोबत

पलक : BM ला वेडं करुन घरी बसवायचं आहे.

पीयूष जीजू : कुहू घरी येणार आहे. उद्या कुहूचा रुम स्वच्छ केला जाईल.

पलक : कुहूने शरदला म्हटलंय की ती जर समोर आली तर मारुन टाकेन

पलक : आयुषीने येऊन परत काम खराब केलं

पलक : आयुषीने वैनी आणि कुहूचे फोटो जाळून टाकले

नेमकं प्रकरण काय?

दिवंगत अध्यात्मिक गुरु संत भय्यू महाराज यांनी 12 जून 2018 रोजी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी भय्यू महाराजांचे दोन सेवक विनायक आणि शरद यांना अटक केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पलकने भय्यू महाराजांसोबत अश्लील व्हिडीओ बनवले होते. ती या सेवकांच्या मार्फत भय्यू महाराजांना ब्लॅकमेल करायची. तसेच तिने भय्यू महाराजांवर लग्नासाठी देखील दबाव केला होता. पण त्यांनी आयुषीसोबत लग्न केलं होतं.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

स्वेरीमध्ये ‘नॅशनल एज्युकेशन डे’ उत्साहात साजरा

पंढरपूर - गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मध्ये यंदाचा ‘राष्ट्रीय शिक्षण…

2 days ago

पंढरपुरात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे रोबोटिक,लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ.शैलेश पुणतांबेकर यांची सेवा उपलब्ध

लाईफलाईन हॉस्पिटल येथे कॅन्सरसह विविध गंभीर आजारावर शस्त्रक्रियांची सोय डॉ. शैलेश पुणतांबेकर हे पुण्यातील एक…

6 days ago

स्वेरीमध्ये अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटरसाठी नीति आयोगाबरोबर सामंजस्य करार

पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या कॅम्पसमध्ये ‘अटल कम्युनिटी इनोव्हेशन…

1 week ago

येत्या शनिवारी स्वेरीत माजी विद्यार्थी मेळावा आणि पदवीप्रदान समारंभ

पंढरपूर- ‘गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा 'माजी विद्यार्थी मेळावा' आणि ‘पदवीप्रदान समारंभ’ स्वेरी कॉलेज कॅम्पस मध्ये येत्या…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे कृत्रिम बुद्धिमत्ता व व्हिजन तंत्रज्ञानावर चर्चा

पंढरपूर सिंहगडमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन: पंढरपूर : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

1 week ago