शिवसेना पदाधिकाऱ्याची घरात घुसून केली हत्या,भंडाऱ्यातील घटना

नाशिकमध्ये भाजप पदाधिकाऱ्याच्या हत्येची घटना ताजी असतानाच भंडाऱ्यात शिवसेना पदाधिकाऱ्याचाही खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भंडारा तालुक्यातील दवडीपार बेला येथील उपसरपंचांची चाकूने वार करुन निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचा आरोप केला जात आहे.

काय आहे प्रकरण?

घराशेजारी असलेल्या लोकांसोबत आरोपीचे जुने भांडण होते. शुक्रवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास या भांडणाचा वचपा काढण्यासाठी आरोपी हे दवडीपार बेला येथील उपसरपंच दिनेश बांते यांच्या घरी गेले. घरी जाऊन त्यांनी बांते यांच्या शरीरावर चाकूने वार केला. हल्ल्यानंतर आरोपी पसार झाले.

दिनेश बांते यांचा मृत्यू

दिनेश बांते यांना रुग्णवाहिकेतून भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती भंडारा शहर पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून आरोपींचा शोध सुरु केला आहे.

कोण होते दिनेश बांते?

दिनेश बांते हे भंडारा तालुक्यातील दवडीपार बेला येथील उपसरपंच होते. त्याचप्रमाणे ते शिवसेनेचे विभाग प्रमुख म्हणूनही कार्यरत होते. घरात घुसून शिवसेना पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. बांते यांची हत्या करणाऱ्या आरोपींचा तपास पोलीस करत आहेत.

नाशकात भाजप पदाधिकाऱ्याची हत्या

दुसरीकडे, नाशिकमधील सातपूरचे भाजप मंडल अध्यक्ष अमोल इघे यांच्या निर्घृण हत्येनंतर स्थानिक राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्यातच इघेंची हत्या करणारा संशयित आरोपी हा राष्ट्रवादीचा पदाधिकारी असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

शुक्रवारी पहाटे सहा वाजताच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने अमोल इघे यांना फोन केला. त्यांना घराबाहेर बोलावून धारदार शस्त्राने वार करत इघेंची निर्घृण हत्या केली होती. संशयित आरोपी हा राष्ट्रवादीच्या कामगार वंचित आघाडीचा पदाधिकारी असल्याचं बोललं जातं. त्याने महिन्याभरापूर्वी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

5 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

1 week ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

2 weeks ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

2 weeks ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago