ताज्याघडामोडी

वऱ्हाडींचं स्वागत करतानाच फुटलं कॉफी मशीन, स्फोटात एकाचा मृत्यू; अनेक जखमी

लग्नसमारंभात पाहुणे मंडळी जमली असताना अचानक कॉफीच्या मशीनचा स्फोट झाल्यामुळे एकाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

लग्न समारंभात खाण्यापिण्याची जबाबदारी एका कंत्राटदाराला देण्यात आली होती. त्यानं कॉफीसाठी आणून ठेवलेल्या मशीनमधून अनेकजण कॉफी घेतही होते. मात्र अचानक जोरदार धमाका होत हे मशीन फुटलं आणि लग्नसमारंभावर शोककळा पसरली. अशी घडली दुर्घटना मध्यप्रदेशातील जबलपूरजवळच्या रिठोरी गावात सीताराम बंजारा यांच्या मुलीचं लग्न होतं.

या लग्नासाठी केटरिंगचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेल्या संस्थेनं कॉफीसाठी एक मशीन ठेवलं होतं. त्या मशीनमध्ये उकळती कॉफी भरून ठेवण्यात आली होती. वऱ्हाडी मंडळी लग्नकार्यात दाखल झाल्यानंतर सर्वजण नाश्ता आणि कॉफी घेण्यात मग्न होते. तेवढ्यात कॉफीचं हे मशीन फुटलं आणि जोरदार धमाका झाला.

एकाचा मृत्यू कॉफीच्या मशीनच्या अगदी जवळ उभ्या असणाऱ्या एका 40 वर्षांच्या व्यक्तीचा यात होरपळून मृत्यू झाला. उकळती कॉफी शरीरावर पडल्यामुळे तो गंभीररित्या भाजला आणि हॉस्पिटलमध्ये त्याला मृत घोषित करण्यात आलं. त्याचप्रमाणं या मशीनच्या जवळ उभ्या असलेल्या अनेकांना कॉफीचे चटके बसले असून ते पोळले गेले आहेत. जखमींना हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं असून त्यातील काहीजणांची प्रकती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.

केटररविरोधात गुन्हा पोलिसांनी केटररविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. केटररचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीने जाणीवपूर्वक ही हत्या केली नसली, तरी त्याच्या निष्काळजीपणामुळे एका व्यक्तीचा जीव गेला आहे. कॉफीचं मशीन नेमकं कशामुळे फुटलं, याचं कारण स्पष्ट झालेलं नाही.

पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. मात्र या दुर्घटनेमुळे एका हसत्या खेळत्या समारंभावर दुःखाची शोककळा पसरल्यामुळे आणि एकाला हकनाक आपला जीव गमवावा लागल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

स्वेरीमध्ये ‘नॅशनल एज्युकेशन डे’ उत्साहात साजरा

पंढरपूर - गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मध्ये यंदाचा ‘राष्ट्रीय शिक्षण…

4 days ago

पंढरपुरात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे रोबोटिक,लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ.शैलेश पुणतांबेकर यांची सेवा उपलब्ध

लाईफलाईन हॉस्पिटल येथे कॅन्सरसह विविध गंभीर आजारावर शस्त्रक्रियांची सोय डॉ. शैलेश पुणतांबेकर हे पुण्यातील एक…

1 week ago

स्वेरीमध्ये अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटरसाठी नीति आयोगाबरोबर सामंजस्य करार

पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या कॅम्पसमध्ये ‘अटल कम्युनिटी इनोव्हेशन…

1 week ago

येत्या शनिवारी स्वेरीत माजी विद्यार्थी मेळावा आणि पदवीप्रदान समारंभ

पंढरपूर- ‘गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा 'माजी विद्यार्थी मेळावा' आणि ‘पदवीप्रदान समारंभ’ स्वेरी कॉलेज कॅम्पस मध्ये येत्या…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे कृत्रिम बुद्धिमत्ता व व्हिजन तंत्रज्ञानावर चर्चा

पंढरपूर सिंहगडमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन: पंढरपूर : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

1 week ago