ताज्याघडामोडी

सोलापूर जिल्ह्यातील ५ नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर, २१ डिसेंबरला मतदान

महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील जिल्हा बँक निवडणुकींची रणधुमाळी संपली. सध्या विधानपरिषदेच्या 6 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. हे सुरु असतानाचं राज्य निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील 105 नगरपंचायंतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. नंगरपंचायत निवडणुकीसोबत सागंली मिरज कुपवाड, अहमदनगर आणि धुळे महापालिकेतील पोटनिवडणूक देखील होणार आहे.

ओबीसी आरक्षण अध्यादेशानंतरची पहिली निवडणूक

स्थानिक स्वराज संस्थांमधील ओबीसींचं आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द झाल्यानंतर राज्यात मोठा संघर्ष निर्माण झाला होता. ओबीसी संघटना आणि नेत्यांकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली होती. ओबीसी आरक्षणासंदर्भातील ठराव विधानसभेत मंजूर होत असताना गोंधळ घातल्या प्रकरणी भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं होतं.

राज्य सरकारनं त्यानंतर सप्टेंबर महिन्यात ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश काढला होता. या अध्यादेशाला मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आलं आहे. मात्र, हायकोर्टानं याचिकेवरील सुनावणी सुरु असताना निवडणूक प्रक्रिया सुरु ठेवण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून नगरपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.

आचार संहिता लागू

राज्यातील 32जिल्ह्यातील 105 नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्यात 21 डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पडेल. तर, 22 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी यासंदर्भातील घोषणा केली आहे.

निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम

अर्ज दाखल करणे: 1 ते 7 डिसेंबर

अर्जांची छाननी : 8 डिसेंबर

मतदान : 21 डिसेंबर सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30

निकाल : 22 डिसेंबर

जिल्हा निहाय निवडणूक लागलेल्या नगरपंचायती

ठाणे- मुरबाड व शहापूर,

पालघर- तलासरी, विक्रमगड, मोखाडा,

रायगड- खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, पाली (नवनिर्मित),

रत्नागिरी- मंडणगड, दापोली,

सिंधुदुर्ग- कसई-दोडामार्ग, वाभवे-वैभववाडी, कुडाळ,

पुणे- देहू (नवनिर्मित),

सातारा- लोणंद, कोरेगाव, पाटण, वडूज, खंडाळा, दहीवडी,

सांगली- कडेगाव, खानापूर, कवठे-महाकाळ,

सोलापूर- माढा, माळशिरस, महाळूंग-श्रीपूर (नवनिर्मित), वैराग (नवनिर्मित), नातेपुते (नवनिर्मित),

नाशिक- निफाड, पेठ, देवळा, कळवण, सुरगाणा,

धुळे- साक्री,

नंदुरबार- धडगाव-वडफळ्या-रोषणमाळ,

अहमदनगर- अकोले, कर्जत, पारनेर, शिर्डी,

जळगाव- बोदवड,

औरंगाबाद- सोयगाव,

जालना- बदनापूर, जाफ्राबाद, मंठा, घनसावंगी, तीर्थपुरी (नवनिर्मित),

परभणी- पालम,

बीड- केज, शिरूर-कासार, वडवणी, पाटोदा, आष्टी,

लातूर- जळकोट, चाकूर, देवणी, शिरूर-अनंतपाळ,

उस्मानाबाद- वाशी, लोहारा बु.,

नांदेड- नायगाव, अर्धापूर, माहूर,

हिंगोली- सेनगाव, औंढा-नागनाथ,

अमरावती- भातकुली, तिवसा,

बुलडाणा- संग्रामपूर, मोताळा,

यवतमाळ- महागाव, कळंब, बाभुळगाव, राळेगाव, मारेगाव, झरी जामणी,

वाशिम- मानोरा,

नागपूर- हिंगणा, कुही,

वर्धा- कारंजा, आष्टी, सेलू, समुद्रपूर,

भंडारा- मोहाडी, लाखनी, लाखांदूर,

गोंदिया- सडकअर्जुनी, अर्जुनी, देवरी, सावली, 

चंद्रपूर- पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती, सिंदेवाही-लोनवाही, मुलचेरा,

गडचिरोली- एटापल्ली, कोरची, अहेरी, चामोर्शी, सिरोंचा, धानोरा, कुरखेडा आणि भामरागड.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

2 days ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

6 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 week ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago