ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगडच्या ५ विद्यार्थ्यांची “जेनवाय साॅफ्टेक सोल्युशन्स” कंपनीत निवड

पंढरपूर: प्रतिनिधी 

एस.के.एन.सिहंगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या ५ विद्यार्थ्यांची “जेन वाय साॅफ्टेक सोल्युशन्स” कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड करण्यात आली असल्याची माहिती महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी दिली.

“जेनवाय साॅफ्टेक सोल्युशन्स” हि आयटी सोल्युशन्स देणारी बावधन, पुणे येथील कंपनी आहे. या कंपनीची स्थापना २०१३ साली झाली असुन कंपनीचे मुख्य ऑफिस न्यूजर्सी, अमेरिका येथे आहे. “जेनवाय साॅफ्टेक सोल्युशन्स” हि कंपनी अमेरिकेतील क्लायंट पुर्णत: साॅफ्टवेअर डेव्हलपमेंट व केपीओ हि सेवा देते.

पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन कॅम्पस ड्राईव्ह मधुन “जेनवाय साॅफ्टेक सोल्युशन्स” कंपनीचे प्रोप्रायटर डायरेक्टर भालचंद्र मोने, प्रोजेक्ट मॅनेजर भाग्यश्री रामदासी-मोने, यांनी मुलाखतीतून ५ विद्यार्थ्यांची निवड केली.

अशा या “जेनवाय साॅफ्टेक सोल्युशन्स” कंपनीत पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील शारंग कुमार बडवे, सिव्हिल इंजिनिअरींग विभागातील गणेश वाघमारे, इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागातील स्वाती नागटिळक, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागातील ऋतुजा नरसिंह बडवे, ज्ञानदा बिडकर आदी ५ विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली आहे.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अल्ताफ मुलाणी, डाॅ. संपत देशमुख, डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. चेतन पिसे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. समीर कटेकर, प्रा. अभिजित सवासे, प्रा. योगिनाथ कलशेट्टी आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

4 weeks ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago

कर्मयोगीच्या तब्बल ११० विद्यार्थ्यांची झेंसार कंपनी मध्ये निवड.

श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्‍या…

1 month ago