ताज्याघडामोडी

पंढरी सायकल मॅरेथॉन-२०२१चे आयोजन

पंढरी सायकल मॅरेथॉन-२०२१चे आयोजन!

 

           पंढरपुर दि:23:-   देशहितास्तव व आपली धनलक्ष्मी टिकून राहण्यासाठी इंधनाची बचत करणे, प्रत्येक भारतीयाचे आद्यकर्तव्य ठरते. 19 व्या व 20 व्या शतकात अवघ्या जगावर अधिराज्य करत असलेली , दळणवळण, प्रवासाचे साधन असलेली सायकल 21 व्या शतकात मात्र ऐषोराम जीवनपद्धतीमुळे दुरावली आहे. अशा सायकल चालविण्याचे आरोग्यालाही शेकडो फायदे असून, सायकलमुळे प्रदुषण होत नसल्याने पर्यावरण जागृतीसाठी आम्ही पंढरपूरकर फाऊंडेशन व जिल्हा सायकलिंग असोशिएशन  सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने  दिनांक 28 नोव्हेबर रोजी पंढरी सायकल मॅरेथॉनचे पंढरपूर येथे आयोजन केले आहे.  

              या बाबींचा साकल्याने विचार करुन, सायकलची गोडी वाढण्याच्या दृष्टीने व इंधनबचत व्हावी, आरोग्य सदृढ राहावे, पर्यावरण टिकून राहावे, मानसिक व शारिरीक व्यायाम व्हावा, प्रदुषण होऊ नये, वृक्षतोड होऊ नये, अशा व्यापकतेने महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर येथे आम्ही पंढरपूरकर फाऊंडेशन व जिल्हा सायकलिंग असोसीऐशन सोलापुर यांच्या सयुक्त विधमाणे रविवार दि २८ नोव्हेंबर -२०२१ रोजी सकाळी ०६:०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजन केले असून, यात महाराष्ट्रासह अनेक राज्यातील सायकलस्वारांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. सहभागी सायकलस्वारांना टिशर्ट व सहभागी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. पंढरी सायकल मॅरेथॅान हि स्पर्धा नसून सामाजिक जागृतीसह आनंद घेण्याचा व देण्याचा, तसेच आरोग्य व पर्यावरण रक्षणाचा, इंधन बचतीचा एक उपक्रम आहे.

          आपण या पंढरी सायकल मॅरेथॉन मध्ये विविध प्रकारे सहभागी होऊ शकता!  सायकलस्वार म्हणून, आयोजक म्हणून, प्रायोजक म्हणून टीशर्टस् वर आपल्या उत्पादनाची जाहिरात करुन टीशर्ट सायकलस्वारांना भेट देऊन, सायकलस्वारांना एखादी सायकल भेट देऊन, सायकलस्वारांचे सहर्ष स्वागत करुन, सायकलस्वारांना शक्तीवर्धक खाद्य, गोळ्या-बिस्किटे देऊन, आपण सहभागी होऊ शकता.  व्यवस्थापनात भाग घेऊन, सायकलस्वारांसाठी स्वागत कमानी उभारुन, डॅाक्टर म्हणून, समस्त पंढरपूरकरांचा उपक्रम आहे म्हणून अशा विविध प्रकारे आपण आपला पंढरपूरकरांचा उपक्रम आहे म्हणून येनकेन योगदानाने आपण सहभागी होऊन उपकृत करण्याचे आवाहन आम्ही पंढरपूरकर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व पंढरी सायकल मॅरेथॉनचे मुख्य आयोजक सागर कदम यांनी समस्त पंढरपूरकरांना केले आहे. 

  या कार्यक्रमात अनेक मान्यवर, कलाकार, शासकीय अधिकारी, यांचेसह आबालवृद्ध  सहभागी होत आहेत.  सायकलस्वारांना सहभागी होण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज दिनांक 25 नोव्हेबर पर्यंत उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी  ९८२३०७९१७० या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

1 day ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

1 day ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago