ताज्याघडामोडी

शेअर मार्केट जोरदार कोसळलं; गुंतवणूकदारांना आठ लाख कोटींचा फटका

आज आठवड्याच्या सुरुवातीलाच म्हणजे सोमवारी शेअर मार्केटची सुरुवात खराब झाली आहे. बीएसईचा सेन्सेक्स 287.16 च्या अंशांनी म्हणजेच 0.48 टक्क्यांच्या घसरणीसह 59,348.85 च्या स्तरावर उघडला. दुसरीकडे निफ्टी देखील घसरणीसह उघडला.

दोन्हीही इंडेक्स लाल निशाण्यावर उघडल्यानंतर आज दिवसभरात देखील शेअर मार्केटमध्ये बरीच घसरण झालेली पहायला मिळाली. दिवसभराच्या चढउतारानंतर सेन्सेक्स आज 1170.12 अंशांनी म्हणजेच 1.96 टक्क्यांनी घसरला आहे. दुपारी बारा वाजल्यानंतरच सेन्सेक्समध्ये 890.65 अंशांची घसरण झाली होती.

आठ लाख कोटींचं नुकसान

आज सलग चौथ्या दिवशी शेअर मार्केटमध्ये घसरण पहायला मिळाली आहे. एप्रिलनंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर घसरण झाली आहे. तब्बल सात महिन्यांनंतर झालेल्या दैनंदिन उलाढालीमधील या घसरणीमुळे गुंतवणूकदारांनी इक्विटीमध्ये तब्बल 7.86 लाख कोटी रुपये गमावल्याचं आकडेवारी सांगते. सगळ्याच सेक्टर्समध्ये ही घसरण दिसून आली आहे.

आजच्या ट्रेडिंगमध्ये रिलायन्स, वोडाफोन आयडिया, एअरटेल, PVR, कोटक महिंद्रा बँक, Zomato, Nykaa, Paytm, Sapphire Foods, Cipla, Maruti, Asian Paints, IRCTC आणि कॅडिला हेल्थकेअर यांसारख्या शेअर्सवर लक्ष लक्ष होते. कृषी कायदे रद्द केल्यामुळे PSU स्टॉक्सवर परिणाम झाला आहे. तर O2C करारामुळे रिलायन्समध्येही जोरदार घसरण झाल्याचं पहायला मिळालं आहे. जोरदार कामगिरी करणारा रिलायन्स इंडस्ट्रीचा शेअर सुध्दा 3 टक्क्यांनी घसरला आहे.

निफ्टी देखील कोसळला

लाल निशाण्यावर सुरु झालेल्या मार्केटमध्ये आज निफ्टीमध्येही घसरण झाली आहे. निफ्टीमधअये आज 348.25 अंशांची घसरण झाली आहे. म्हणजेच तब्बल 1.96 टक्क्यांची ही घसरण आहे. सध्या निफ्टी 17416.55 स्तरावर आहे. आज निफ्टी देखील मार्केटच्या सुरुवातीलाच कोसळलेला दिसून आला. सुरुवातीलाच 87.35 अंश वा 0.49 टक्क्यांनी घसरला होता.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

3 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

3 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago