केरळमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका लग्नाला नकार दिल्याने प्रेयसीने प्रियकराच्या चेहर्यावर अॅसिड फेकले आहे. यामुळे तरुण गंभीर जखमी झाला असून तरुणीलाही दुखापत झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अरुण कुमार या 27 वर्षीय तरुणाची शीबा या 35 वर्षीय तरुणीशी सोशल मीडियातून ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. काही दिवसांपूर्वी अरुण कुमारने शीबाला लग्नाला नकार दिला. तसेच अरुण दुसर्या मुलीशी लग्न करणार होता. त्यामुळे शीबा अरुणवर खूप चिडली होती.
16 नोव्हेंबर रोजी शीबाने अरुणला अदिमली येथील एका चर्चजवळ भेटायला बोलवले. तेव्हा शीबाने अरुणच्या चेहर्यावर अॅसिड फेकले. या हल्ल्यात अरुण गंभीर जखमी झाला, त्याचा एक डोळा निकामी झाला असून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच शीबाच्याही चेहर्यावर अॅसिड पडले असून तीही जखमी झाले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी शीबा विरोधात गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे. तसेच या बाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…