19 वर्षीय मैत्रिणीची चाकूने वार करून हत्या केल्यानंतर 21 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कर्नाटकात उघडकीस आली आहे. गुरुवारी संध्याकाळी आरोपीने संबंधित तरुणी राहत असलेल्या घराच्या छताला गळफास लावून आपल्या आयुष्याची अखेर केली.
काय आहे प्रकरण?
संबंधित तरुणी बंगळुरुतील जिगानी येथील निसर्ग लेआउट येथे राहत होती. तिचे नाव डी सिंचना असल्याची माहिती आहे. तिचे वडील दोड्डाय्या यांचे आणेकलच्या हरपनहल्ली भागात हार्डवेअरचे दुकान होते. सिंचना ही तिच्या वडिलांची एकुलती एक मुलगी होती. किशोर कुमार असे मृत आरोपीचे नाव असून तो एका गोदामासाठी ट्रक चालक म्हणून काम करत होता.
आई-वडील घरात नसताना हत्या
सिंचना ही बन्नेरघट्टा रोडवरील एका खासगी महाविद्यालयात प्रथम वर्षाची विद्यार्थिनी होती, असे तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले. दोड्डाय्या आणि त्यांची पत्नी बाहेरगावी गेले होते, संध्याकाळी घरी परतल्यावर त्यांना हे भयावह दृश्य पाहायला मिळालं. त्यांची मुलगी सिंचनाचा गळा चिरलेल्या अवस्थेत पडली होती, तर किशोर छताला लटकलेला दिसला, असे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे.
सिंचनाच्या मृतदेहाजवळ अभ्यासाची पुस्तके आणि काही नोट्स सापडल्या, ज्यावरून ती घटनेच्या वेळी अभ्यास करत होती असा अंदाज लावला जात आहे.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…