गुन्हे विश्व

पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय, धारदार चाकूने 30 वेळा वार करुन हत्या

हरियाणातील सोनीपत शहरात पती-पत्नीच्या नात्याच्या ठिकऱ्या उडाल्याची घटना समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिच्या अंगावर धारदार शस्त्राने 30 हून अधिक वेळा वार केले, यामध्ये महिलेचा मृत्यू झाला.

हरियाणातील सोनीपत शहरात तारानगर येथे राहणाऱ्या शत्रुघ्न नावाच्या व्यक्तीला पत्नी पूनमच्या चारित्र्यावर संशय होता. हत्येच्या घटनेची माहिती मिळताच सोनीपत पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन पुढील कारवाई सुरु केली आहे.

काय आहे प्रकरण?

सोनीपतच्या तारानगरमध्ये राहणाऱ्या शत्रुघ्न आणि पूनम या दाम्पत्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. शत्रुघ्नला पत्नी पूनमच्या चारित्र्यावर संशय होता. तिचे बाहेर अनैतिक संबंध असल्याचं त्याला वाटत होतं. यावरून त्यांच्यात वारंवार वादही व्हायचे. घटनेच्या दिवशीही याच संशयातून त्याने आधी पत्नीशी भांडण केले. त्यानंतर पूनमच्या अंगावर धारदार चाकूने जवळपास 30 वेळा वार केले. यामुळे पूनमचा जागीच मृत्यू झाला.

विवाहितेच्या वडिलांच्या जबाबावरुन पतीवर गुन्हा

घटनेची माहिती मिळताच सोनीपतच्या सिव्हिल लाइन्स पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत शासकीय रुग्णालयात पाठवला. मृत पूनमचे ​​वडील भगवान दास यांच्या जबाबावरून पोलिसांनी शत्रुघ्नविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या शोधात छापेमारी सुरु आहे.

चारित्र्याच्या संशयातून दाम्पत्यात वारंवार वाद

या प्रकरणाची माहिती देताना सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात तैनात असलेले उपनिरीक्षक राकेश कुमार म्हणाले की, तारानगरमध्ये पतीने पत्नीचा धारदार शस्त्राने खून केल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. पूनम असे मृत महिलेचे नाव असून तिचा पती शत्रुघ्न याला तिच्या चारित्र्यावर संशय असल्याने तिची हत्या करण्यात आली.

पूनमच्या अंगावर 30 हून अधिक वेळा धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले होते. या संपूर्ण प्रकरणी पूनमच्या वडिलांच्या जबाबावरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

4 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

1 week ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

1 week ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

1 week ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

2 weeks ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago