सोलापूर येथे पोलीस भरतीसाठीच्या लेखी परीक्षेस दुचाकीवर निघालेल्या दोन तरुणास भैरवनाथ वाडी तालुका पंढरपुर नजीक समोरून रॉंग साईडने आलेल्या मारुती इको कार चालकाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात हे परीक्षार्थी तरुण जबर जखमी झाले आहेत.या बाबत कृष्णा बाळासाहेब माने याने पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून ती पुढील प्रमाणे आहे.
या बाबत दाखल झालेली फिर्याद
मी कृष्णा बाळासाहेब माने वय. 24 वर्षे धंदा शिक्षण, रा. संगेवाडी ता. सांगोला समक्ष विचारलेवरून जबाब देतो कि, मी सध्या उपजिल्हा रूग्मालय पंढरपूर येथे उपचार घेत आहे मी सध्या पूर्णपणे शुद्धीवर आहे. मोनं. 9527399014 मी माझे घरी आई सीमा, वडिल बाळासाहेब , बहिण वैशाली असे एकत्रात राहणेस असून माझे वडिल बाळासाहेब हे मजूरी करून आमचे कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात . मी व माझे सोबत सोहम प्रभाकर कांबळे, सचिन गंगाधर सोनलकर असे मिळून गेली 3 महिण्यापासून पंढरपूर येथे कवठेकर प्रशालेचे जवळ बाडगे पाटील यांचे मालकिचे रूममध्ये आम्ही पोलीस भरतीचा सराव करणेकरता भाड्याने राहत होतो. दु. 19/11/2021 रोजी सकाळी 10/15 वा. चे सुमारास मी व माझा मित्र सोहम प्रभाकर कांबळे असे मिळून माझा मित्र सोहम याचे डिस्कव्हर मो.सा.नं. MH 45 W 3151 याचेवर व दुसरी मो.सा. नं. MH 13 CA 2657 HF डिलक्स या मो.सा वर माझा मित्र मंगेश दंदाडे व सचिन सोलनकर असे आम्ही चौघे मिळून दोन मोटार सायकल वरती पंढरपूर येथून पोलीस भरती लेखी परीक्षा देणे करता निघालो होतो. आम्ही पंढरपूर येथून सोलापूर रोडने चाललो असताना आम्ही नाईकनवरे मळा याचे समोर रोडवर भैरवनाथ वाडी ता. पंढरपूर येथून जात असताना माझी मोटार सायकल माझा मित्र सोहन कांबळे चालवित होता. माझी मोटार सायकल पूढे होती. माझा मित्र मंगेश दंदाडे व सचिन सोलनकर यांची मोटार सायकल आमचे पाठीमागे होते. माझे मोटार सायकलचे समोरून एक मारूती सुजुकी युको चारचाकी गाडी समोरून राँग साईडने येवून आमचे दोन्ही मोटार सायकलीस समोरून जोराची धडक देवून तसेच रस्त्याचे काम चालू असल्याने सदर चारचाकी गाडी ही आंम्हीस धडक देवून रस्त्याचय्या साईडला थांबलेल्या टिपरच्या खाली गेली. आमचे दोन्ही मोटार सायकलीस धडक दिलेने आंम्ही चौघजण मोटार सायकलीसह खाली पडलो तेव्हा मला माझे डावे डोळ्यास, डावे हातास , डावे पायाचे गुडघ्यास व माझा मित्र सोहम यास ओठास, तोंडास व ओठास दात घुसलेले आहेत. तसेच डोकीस व कपाळावर जखम झालेली आहे. माझा मित्र सचिन सोलनकर याचे डोकिस , पाठीचे मणक्यास मार लागल्याने , डोकीस , कपाळाजवळ रक्त येत आहे, माझा मित्र मंगेश दंदाडे यास गंभीर मार लागल्याने त्यास पंढरपूर येथिल पाटील हाँस्पिटल येथे उपचारास रेफर केले आहे. व आंम्ही तिघास सोमनाथ प्रकाश तरंगे यांनी अपघात झालेल्या ठिकाणावरून पिकअप मध्ये घालून आणून उपजिल्हा रूग्णालय पंढरपूर येथे अँडमिट केले आहे. सध्या माझेवर व माझे दोन मित्र सोहम व सचिन यांचेवर उपचार चालू आहेत. आंम्ही तिघेजण सध्या पूर्णपणे शुद्धीवर आहोत. तरी दि. 19/11/2021 रोजी 11/40 वा. चे सुमारास मी माझा मित्र सोहम,सचिन,मंगेश असे मिळून आंम्ही दोन मोटार सायकलवर बसून पंढरपूर येथून सोलापूर येथे पोलीस भरती लेखी परिक्षेसाठी जात असताना सोलापूर रोडवर नाईकनवरे मळा भैरवनाथ वाडी ता. पंढरपूर येथे गेलो असता तेथे रोडचे काम चालू होते. आमचे मोटर सायकलचे समोरून एक मारूती सुजूकी युको चारचाकी गाडी भरधाव वेगात राँग साईडने येवून आमचे दोन्ही मोटार सायकलीस जोराची धडक देवून जखमी करणेस व आमचे दोन्ही मोटार सायकलचे सुमारे 20000/- चे नुकसान केले आहे तरी माझी मारूती सुजूकी युको चारचाकी गाडी नं. MH 13 AZ 8367 सदर वाहण व सदर वाहणाचे अज्ञात चालकाविरूद्ध माझी फिर्याद आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…