शेळ्या चरण्यासाठी गेलेल्या दोघा सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना चांदवड तालुक्यातील पाटे गावात घडली आहे. या घटनेमुळे पाटे गावावर शोककळा पसरली आहे. पाटे येथील प्रगतशील शेतकरी संजय तळेकर यांचा मोठा मुलगा ओम (१३) व लहान मुलगा साईल हे बुधवार सकाळी बारा वाजेच्या सुमारास शेत गट नंबर ७० लगत असलेल्या नाल्या जवळ बकऱ्या चरत होते.
मुलं नेहमीप्रमाणे शेळ्या चरण्यासाठी गेले होते. तेथे जवळच शेततळं होतं. शिवाय पावसामुळे शेततळं काटोकाट भरलं होतं. त्यात बुडून दोघांचाही मृत्यू झाला. मुलांच्या मृत्यूमुळे घरात शोककळा पसरली आहे.
यावेळी ते त्यांच्याच शेततळ्यातील पाण्यात पडले. शेततळे पूर्ण पाण्याने भरले असल्याने त्यांचा शोध घेण्यात वेळ लागला. जवळपास एक तासानंतर नागरिकांच्या मदतीने दोघांना पाण्यातून बाहेर काढीत त्यांना उपचारासाठी चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून दोघेही मयत झाल्याचे सांगितले.
यावेळी त्यांच्या घरच्यांनी ओम अन साईलच्या नावाचा एकच टाहो फोडल्याने संपूर्ण उपजिल्हा रुग्णालयाचा परिसर सुन्न झाला होता. संजय तळेकर यांना ओम व साईल हे दोघेच मुले असल्याने त्यांचा अशा अपघाती मृत्यू झाल्याने संपूर्ण पाटे गावातील नागरिक हळहळ व्यक्त करीत आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…