पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांनी मुंबई मंत्रालय येथे राज्याचे उद्योग मंत्री ना. सुभाष देसाई यांची भेट घेऊन पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्याचा औद्योगिक दृष्टया विकास होण्यासाठी अपेक्षित असलेल्या उपाय योजना आणि निर्णय या बाबत चर्चा करून विविध मागण्यांसाठीचे पत्र ना. देसाई यांना दिले आहे.
पंढरपूर आणि मंगळवेढा या दोन्ही तालुक्याचे बहुतांश अर्थकारण हे कृषी आधारित आणि कृषी संलग्न व्यवसाय,उद्योग आणि साखर कारखानदारी यावर अवलंबून आहे.कोकण, महामूंबई परिसर आणि पुणे औरंगाबाद यासारखे औदयोगिक शहरे आदी महानगरामध्ये या दोन्ही तालुक्यातील सुशीक्षीतमी,उच्चं शिक्षित आणि कौशल्य अथवा अभियांत्रिकी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या तरुणांना धाव घ्यावी लागते ती केवळ आपल्या परिसरात रोजगार उपलब्ध करून देणारे मोठे प्रकल्प अथवा उद्योग नाहीत यामुळे.पंढरपूर तालुक्यात एमआयडीसी व्हावी हि तर गेल्या चाळीस वर्षाची प्रलंबित मागणी असून पंढरपूर तालुक्यात एमआयडीसी उभारण्यात बाबत अनेक तांत्रिक आणि भूसंपादपन विषयक अडचणी आहेत.त्यामुळे निदान या दोन्ही तालुक्यात शासनाने विविध औद्योगिक प्रकल्प उभारण्यास चालना दयावी अशी मागणी गेल्या काही वर्षात होताना दिसून येऊ लागली आहे.
आमदार समाधान आवताडे यांनी राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे नक्की कुठल्या मागण्यासाठी निवेदन दिले आहे याची अधिकृत माहिती उपलब्ध नसली तरी सोशल मीडियावर मात्र आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर तालुक्यातील एमआयडीसी साठी पाठपुरावा सुरु केला असल्याच्या पोस्ट दिसून येत आहेत.आणि तसे असेल तर पंढरपूर शहर तालुक्याच्या दृष्टीने हि नक्कीच दिलासादायक बाब असेल.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच ८ नोव्हेंबर रोजी पालखी मार्ग लोकापर्ण सोहळ्यात बोलताना पंढरपूर परिसराच्या विकासासाठी राज्य शासन निधी कमी पडू देणार नसल्याचे सांगितले आहे.पंढरपूर हे भूवैकुंठ आहे,वर्षाकाठी लाखो भाविक पंढरपूरला येतात हे लक्षात घेऊन राज्य शासनाने व केंद्र शासनाने भाविकांना समोर ठेवून अब्जावधी रुपयांचा निधी दिला आहे.रस्ते,गटारी आणि भाविकांना अनुकूल सुविधा यासाठीच हा निधी दिला गेल्याचेही दिसून आले आहे.मात्र त्याच वेळी या शहर तालुक्यातील स्थानिक रहिवाशी आपली मुलेबाळे नोकरीच्या शोधात महानगराकडे निघून जात आहेत अन्यथा इथेच कुठल्यातरी दुकानात काम करावे लागत आहे म्हणून चिंतेत असल्याचे दिसून येते. पंढरपूर हे शिक्षणाचे माहेरघर झाले आहे इथे स्वेरी,न्यू सातारा,कर्मयोगी सारखे प्रख्यात अभियांत्रिकी महाविद्यलये आहेत.मात्र नोकरीच्या संधी दुर्मिळ आहेत.त्यामुळे आमदार समाधान आवताडे यांनी राज्याच्या उद्योग मंत्र्याकडे नक्की काय मागण्या केल्या आणि त्या बाबत काय चर्चा झाली याची मोठी उत्सुकता युवा वर्गाला लागली असल्याचे दिसून येते.