मंत्रालयासमोर एसटी कर्मचारी असलेल्या एका महिलेनं आत्मदहनाचा प्रयत्न केल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.13 दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप आणि आंदोलन सुरू आहे. अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांनी आपला निषेध नोंदवला आहे.
मुंबई येथील मंत्रालयासमोर काही कर्मचाऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडले. आत्मदहनाचा प्रयत्न झाल्यावर पोलिसांनी त्या महिलांना शांत करण्याचा प्रयत्न केला.’आम्ही तुमच्या पाया पडतो. आमच्या मागण्या मान्य करा,’ असा आक्रोश त्यांनी केला.
‘एसटी महामंडळाचं राज्य शासनामध्ये विलीनीकरण करण्याची मागणी मान्य करा. तेव्हाच हा संप आम्ही मागे घेऊ असं एसटी कर्मचारी संघटनांकडून सांगितलं जातंय.’
विलीनीकरण करण्यासंदर्भात अहवाल तयार करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश कोर्टाने दिले होते. त्यानुसार ही समिती स्थापन करण्यात आली. पण विलीनीकरणाबाबत लेखी आश्वासन दिल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याचं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे.
‘हे विलीनीकरण एक दोन दिवसांत करणे शक्य नाही. ही प्रक्रिया किचकट आहे,’ असं परिवहन मंत्री अनिल परब हे वारंवार सांगतायेत.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…