राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरु आहे. त्यांच्या मागण्यांसाठी परिवहन मंत्री अनिल परब, एसटी महामंडळ आणि एसटी कर्मचारी संघटनांमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत.
या पार्श्वभूमीवर बार्शी मतदारसंघातील बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनीही संपकरी एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेत त्यांना पाठिंबा दर्शवला. त्यावेळी बोलताना राऊत यांनी दिव्यांगांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. राऊत यांच्या या वक्तव्यानंतर सर्व स्तरातून टीका करण्यात येत होती. त्यानंतर अखेर राऊत यांनी दिव्यांगांसंदर्भात केलेल्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केलीय.
दिव्यांग लोक एसटीने मोफत प्रवास करतात. आणि त्यांच्यासोबत एक व्यक्ती असते. ती व्यक्तीही मोफत प्रवास करते. त्यामुळेच एसटी तोट्यात आहे, असं वादग्रस्त वक्तव्य राजेंद्र राऊत यांनी केलं होतं. त्यानंतर राऊत यांच्यावर सर्व स्तरातून टीका सुरु झाली होती. या टीकेनंतर अखेर राऊत यांनी आपल्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त करुन वादावर पडदा टाकला आहे.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…