ताज्याघडामोडी

लस न घेतलेल्या चौघांचा मृत्यू, लस घेतलेले रुग्ण ठणठणीत; चौथ्या जिनोम सिक्वेन्सिंग चाचणीचे निष्कर्ष जाहीर

कोविड-19 विषाणूच्या जनुकीय सूत्राचे निर्धारण (नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग) करणारी वैद्यकीय यंत्रणा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात कार्यान्वित आहे.

या यंत्रणेने आजवर तीन तुकड्यांमध्ये चाचण्या केल्यानंतर आता चौथ्या तुकडीतील चाचणीचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. तिसऱ्या तुकडीमध्ये मुंबईतील एकूण 281 रुग्णांमधील कोविड विषाणू नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला आहे. यात ‘डेल्टा व्हेरिअंट’ चे 75 टक्के तर ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ चे 25 टक्के रुग्ण आढळले आहेत. 281 पैकी 4 रुग्णांचा मृत्यू झाला असून या चारही जणांनी कोविड लसीचा एकही डोस घेतला नव्हता. तसेच त्यांचे वयदेखील 60 वर्षांपेक्षा अधिक होते. तर लस घेतलेल्यांपैकी एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

चाचणीचे सर्वंकष निष्कर्ष पाहता, कोविड लसीकरणाचा प्रभाव म्हणून साथ पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे या निष्कर्षांवरुन स्पष्ट होत आहे. त्यामुळे सर्व पात्र नागरिकांनी कोविड लस घेणे आवश्यक असून कोविड प्रतिबंधक निर्देशांचे कठोरपणे पालन करणे देखील आवश्यक आहे, हे वारंवार अधोरेखित होत आहे.

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या कस्तुरबा रुग्णालयात नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग लॅबमध्ये चौथ्या चाचणी तुकडीचा (बॅच) भाग म्हणून कोविड बाधा झालेल्या एकूण 345 रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यातील 281 रुग्ण हे मुंबई महानगरातील नागरिक आहेत. त्यामुळे या 281 नमुन्यांसंदर्भातील निष्कर्ष देण्यात येत आहेत. मुंबईतील 281 रुग्णांपैकी 26 रुग्ण (9 टक्के) हे 0 ते 20 वर्षे आतील वयोगटातील आहेत. 21 ते 40 वर्षे वयोगटात 85 रुग्ण (30 टक्के), 41 ते 60 वर्षे वयोगटात 96 रूग्ण (34 टक्के), 61 ते 80 वयोगटात 66 रुग्ण (23 टक्के) आणि 81 ते 100 वयोगटातील 8 रुग्ण (3 टक्के) यामध्ये समाविष्ट आहेत.

चाचणीतील निष्कर्षानुसार, 281 पैकी 210 रुग्ण (75 टक्के) हे ‘डेल्टा व्हेरिअंट’ तर 71 रुग्ण (25 टक्के) हे ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ प्रकारातील कोविड विषाणूने बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. डेल्टा व्हेरिअंट आणि डेल्टा डेरिव्हेटीव्ह या दोन्ही प्रकारातील कोविड विषाणू तुलनेने सौम्य त्रासदायक असून त्यापासून तितकासा गंभीर धोका संभवत नाही. डेल्टा व्हेरिअंट समवेत तुलना केल्यास, डेल्टा डेरिव्हेटीव्ह विषाणू संक्रमण / प्रसार वेग देखील कमी असल्याचे आढळले आहे. असे असले तरी, कोविड बाधा निष्पन्न झाल्यानंतर वेळीच व योग्य वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कोविड लसीकरण हा निकष विचारात घेतल्यास, या 281 पैकी पहिला डोस घेतलेल्या फक्त 8 जणांना तर दोन्ही डोस घेतलेल्या फक्त 21 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. पैकी कोणालाही प्राणवायू पुरवठा, अतिदक्षता उपचारांची गरज भासली नाही. तसेच कोणाचाही मृत्यू ओढवला नाही, ही बाब नमूद करण्याजोगी आहे.

याउलट, लसीचा एकही डोस न घेतलेल्या 69 नागरिकांना बाधा झाली. त्यातील 12 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यातील चौघांना प्राणवायू पुरवठा करावा लागला. तिघांना अतिदक्षता उपचार पुरवावे लागले. तर चार जणांचा मृत्यू ओढवला आहे. मृत्यू ओढवलेले चारही रुग्ण 60 वर्ष वयांवरील वयोवृद्ध होते. यातील दोघांना दीर्घकालीन आजार होते. तर अन्य दोघांना कोणतेही आजार नव्हते. या चौघा रुग्णांना ‘डेल्टा व्हेरिअंट’ ची लागण झालेली होती. हे चारही रुग्ण कोविड बाधा निष्पन्न झाल्यानंतर 2 ते 5 दिवसांच्या विलंबाने रुग्णालयात दाखल झाले. ते देखील त्यांच्या जीवावर बेतले.

याचाच अर्थ, कोविड लस घेणाऱ्यांना व कोविड प्रतिबंधक नियम पाळणाऱ्यांना विषाणू बाधेपासून संरक्षण मिळते तसेच बाधा झाली तरी त्याची तीव्रता पूर्णपणे रोखता येते. तर लस न घेतलेल्यांना कोविड बाधेपासून तीव्र धोका संभवतो, असे म्हणण्यास पुरेसा वाव आहे. वय वर्ष 18 पेक्षा कमी असलेला वयोगट विचारात घेतला तर, एकूण 281 रुग्णांपैकी 19 जण या वयोगटात मोडतात. पैकी 11 जणांना ‘डेल्टा व्हेरिअंट’ आणि 8 जणांना ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ प्रकाराची कोविड लागण झाल्याचे आढळले. याचाच अर्थ, तुलनेने बालक व लहान मुलांना कोविडची बाधा होण्याचे प्रमाण संपूर्णपणे नियंत्रणात आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

2 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

2 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago