पत्नी आपल्याशी बोलत नाही, या कारणातून एका तरुणाने आपल्या पत्नीची भररस्त्यात निर्घृण हत्या केली आहे. आरोपीनं पत्नीचा पाठलाग करत तिला, भररस्त्यात अडवलं, तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण तिने बोलण्यास नकार दिल्याच्या रागातून आरोपीनं पीडितेवर धारदार चाकूने सपासप वार केले आहेत.
हा हल्ला इतका भयंकर होता की यामध्ये 21 वर्षीय पत्नी घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. यातच तिचा दुर्दैवी अंत झाला आहे. या प्रकरणी आरसीएफ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
आकांक्षा अक्षय आठवले असं हत्या झालेल्या 21 वर्षीय महिलेचं नाव आहे. संबंधित घटना मुंबईतील चेंबूर परिसरात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, मृत आकांक्षा हिच 2019 साली आरोपी अक्षयसोबत विवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवस आनंदात गेल्यानंतर, अक्षयचा आलकांक्षा सोबत सतत वाद होऊ लागला. याच रागातून आकांक्षा गेल्या काही महिन्यांपासून पतीपासून वेगळं आपल्या घरी राहु लागली. दरम्यानच्या काळात अक्षयने तिच्याशी अनेकदा बोलण्याचा प्रयत्न केला.
पण आकांक्षाने त्याला कोणताही प्रतिसाद दिला नाही. बुधवारी सकाळी आकांक्षा नेहमीप्रमाणे रिक्षाने आपल्या कामावर जात होती. यावेळी आरोपी अक्षय या रिक्षाचा पाठलाग करत होता. रिक्षा राहुलनगर परिसरात आल्यानंतर आरोपीनं रिक्षाला अडवलं आणि पत्नी आकांक्षाशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण यावेळीही आकांक्षाने पती अक्षयशी बोलण्यास नकार दिला. यामुळे संतापलेल्या अक्षयने आपल्याजवळी धारदार चाकुने आकांक्षावर सपासप वार केले.
हा हल्ला इतका भयंकर होती की, या घटनेच आकांक्षा जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अवस्थेत काही स्थानिकांनी तिला त्वरित सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण याठिकाणी डॉक्टरांनी उपचारपूर्वीच आकांक्षाला मृत घोषित केलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी पती अक्षयविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास आरसीएफ पोलीस करत आहेत.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…