अल्पवयीन युवक आणि युवतीने तासाभराच्या अंतराने विष प्रशान करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रेमप्रकरणातून या दोघांनी आत्महत्या केली असल्याचे बोलले जात असून पोलीस तपास करत आहे.
कुंभार तांडा ता. जामनेर या भागात ही घटना घडली असून, 9 नोव्हेंबर रोजी दुपारच्या भरात आई-वडील शेतात गेल्यानंतर घरी कोणी नसताना 16 वर्षीय युवतीने विष प्राशन करत आत्महत्या केली. त्यानंतर अवघ्या तासाभराच्या अंतरानंतर 17 वर्षीय युवकाने शेतात जाऊन विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. आत्महत्या केल्यानंतर युवकाचा मृतदेह शेतातच पडून होता, त्यानंतर दुसऱ्या दिवशी शेतात त्या युवकाचा मृतदेह आढळून आला आहे.
दोघांचे प्रेमप्रकरणाची चर्चा
आत्महत्या केलेल्या या दोघांचे प्रेमप्रकरण सुरू असल्याची चर्चा सध्या गावात आहे. मात्र गावकरी पोलिसांना कोणत्याही प्रकारची माहिती देण्यास नकार घालत आहे. पोलिसांनी आत्महत्या केलेल्या मुलाचा मोबाईल तपासले असता त्यात त्याची प्रेयसीच्या मेहुण्याच्या जाचाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचा एसएमएस पवननेल आत्महत्यापूर्वी त्याच्या काकाला पाठवला होता. अशी माहिती पोलीसांनी दिली आहे. चौकशीसाठी दोघांच्या नातेवाईकांना पोलिस ठाण्यात बोलावले असून तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…