सोलापूर – बचत गटांनी बॅंकांनी सहकार्य करणे अपेक्षीत आहे. ज्या बॅंका सहकार्य करणार नाहीत त्यांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविणेत येईल. अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागात आज महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत, जिल्हा अभियान कक्ष, उमेद चे जिल्ह्यास्तरावरील व तालुक्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांची बैठक आयोजित करण्यात आले होती. या बैठकीमध्ये वर्ष 2021-2022 चे उर्वरित कामाचे नियोजन व आढावा मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतला. या बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागाचे प्रकल्प संचालक संतोष धोत्रे, सहा प्रकल्प संचालक कुलकर्णी, जिल्हा अभियान व्यवस्थापक मिनाक्षी मडीवाळ उपस्थित होते.
या बैठकीत मध्ये जिल्ह्यातील पात्र समूहांचे प्रस्ताव बँकेत तात्काळ सादर करण्याच्या सक्त सुचना मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिल्या. ज्या बँकेचे अधिकारी सहकार्य करणार नाहीत ते कळवावे. त्यांचे प्रस्ताव कारवाई साठी शासनाकडे पाठविणेत येतील अशा स्पष्ट सुचना सिईओ स्वामी यांनी दिल्या. आझादी का अमृत महोत्सव अंतर्गंत सर्व कार्यक्रम घेऊन ते पोर्टल वर नोंद करावी अशा सुचना दिल्या.
सर्व बचतगट सदस्यांचे लसीकरण करा- प्रकल्प संचालक संतोष धोत्रे
जिल्हा व्यवस्थापक यांना बँक कर्ज वाटप व इतर व्हर्टिकल चे कामकाज पूर्ण करून घेणे साठी तालुका दत्तक देण्यात आले आहेत या कामांची प्रभावी अंमलबजावणी करणेचे सुचना प्रकल्प संचालक संतोष धोत्रे यांनी दिल्या. दर आठवड्यास जिल्हा व्यवस्थापक यांचा आढावा घेतला जाईल असे सांगितले. जिल्ह्यातील सर्व बचतगट सदस्यांचे लसीकरण करून घ्या. असेही प्रकल्प संचालक संतोष धोत्रे यांनी सांगितले. डिसेंबर मध्ये तालुक्यांचे रँकिंग करण्यात येईल असेही प्रकल्प संचालक धोत्रे यांनी सांगितले.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…