माळकवठे तालुका दक्षिण सोलापूर येथे शिक्षक सहकार संघटनेचे पुणे विभाग सरचिटणीस यांच्या सुचनेनुसार जिल्हा सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षक सहकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविराज खडाखडे यांच्या नेतृत्वात व पुणे विभागीय सरचिटणीस दिपक परचंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर जिल्हा सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या सभेमध्ये शिक्षकांना येणार्या अडचणी सोडवण्यासाठी शिक्षक सहकार संघटना नेहमी प्रयत्नशील असल्याचे मत जिल्हा कोषाध्यक्ष सचिन निरगिडे यांनी आपल्या प्रास्ताविका मध्ये मत मांडले.संघटना नेहमी सर्वात तळातील शिक्षकांचे प्रश्न सोडवत आहे. यामध्ये वेतननिश्चिती करताना सातव्या वेतन आयोगातील ञुटीं दूर करणे, जुनी पेंशन या मागणी साठी चळवळ अधिक गतिमान करणे,केंद्रप्रमुख पदोन्नती,मेडीकल बिलांची सर्व प्रकरणे तातडीने मंजूर करणे,डाॅ.चटोपाध्याय वेतनश्रेणी मंजुर करणे,समाजशास्ञ ऐच्छिक नकार व विज्ञान पदोन्नती, रॅण्डम ग्रस्त शिक्षकांचे समुपदेशन,आंतरजिल्हा आपसी सेवा जेष्टता,जिल्हा शिक्षक सोसायटी निवडणूक या सर्व प्रश्नांवर चर्चा करून प्रशासनाने हे सर्व प्रश्न सोडवून अन्यायग्रस्त शिक्षक बांधवांना न्याय देण्यासाठी शिक्षक सहकार संघटना प्रयत्नशील असल्याचे मत विभागीय सरचिटणीस दिपक परचंडे यांनी मांडले.
सभेमध्ये जिल्हा कार्यकारणीचा प्रस्ताव मांडून सर्वानुमते जिल्हा उपाध्यक्षपदी रविंद्र जेटगी तर जिल्हा संघटक पदी सुनिल पवार यांची निवड बिनविरोध केली.सदर निवडीचे निवड व अभिनंदन पञ जिल्हाध्यक्ष रविराज खडाखडे यांच्या हस्ते देण्यात आले. ही सभा यशस्वी करण्यासाठी मंगळवेढा तालुका अध्यक्ष विजय बबलेश्वर,तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण राठोड,सिध्दया कोळी,राजकुमार कोळी,राजू राठोड, सोमलिंग बिराजदार,विठ्ठल पाटील,राजेंद्र वाघमोडे,मंगेश नकाते आदींनी परीश्रम घेतले.सदर सभेसाठी जिल्ह्यातील शिक्षक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदरील निवडीसाठी राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड ,उपाध्यक्ष निलेश देशमुख, राज्य संघटक विठ्ठल टेळे, महिला राज्याध्यक्ष उमा घोरपडे, पुणे विभाग प्रमुख मनोज कोरडे,नागपूर विभाग प्रमुख रवी अंबुले,नाशिक विभाग प्रमुख अविनाश जुमडे यांनी अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. सदरील सभेचे सुञसंचालन रामसिंग पवार तर आभार सिध्दराम कोळी यांनी केले.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…