ताज्याघडामोडी

लग्न दुसरीकडे ठरवलं म्हणून प्रियकराचा प्रेयसीवर गोळीबार; स्वत:लाही संपवलं !

एकतर्फी प्रेमप्रकरणामध्ये मुलीने आपल्याला नाकारत दुसऱ्या मुलाशी लग्न का ठरवले या रागातून ऐका माथेफिरु प्रियकराने चक्क प्रेम करणाऱ्या मुलीवरती गोळी झाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मुलगा विक्की आणि पीडीत मुलगी हे दोघे एकमेकांचे नातेवाईक होते. मुलाचं पीडीत मुलीवरती प्रेम होतं मात्र यांच लग्न वेगवेगळ्या ठिकाणी ठरल्यामुळे विक्की नाराज होता आणि या नाराजीतूनच त्यांनी हे धक्कादायक कृत्य केलं असल्याची माहिती समोर येत आहे.

सदरील घटना दिल्लीमधील मुंडका येथे घडली आहे. मुलीचं लग्न दुसऱ्या तरूणासोबत लावून दिल्यामुळे त्या मुलीवरती एकतर्फी प्रेम करणाऱ्या विक्कीने मंगळवारी दुपारी जवळपास 3 च्या दरम्यान मुलीच्या घरात घुसून तिच्यावर गोळी झाडली. मुलीवर गोळी झाडल्यावरती त्याच्या आईने आरडाओरडा केल्यावरती मात्र लोक गोळा झाले आणि त्याला फटकारलं आणि त्याला एका खोलीत बंद केलं. मात्र त्याने त्या खोलीतच स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली. संबधीत मुलीच्या पायावर गोळी लागली असून तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मात्र यामध्ये गोळीबार करणाऱ्या मुलाचा जीव गेला आहे.

दरम्यान या सर्व प्रकरणाबाबत मुंडका पोलिसांनी गुन्हा नोंद करून चौकशी सुरू केली आहे. तरूणाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पपठवला असून त्याने स्वत:वर छातीत गोळी झाडून घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलीसांनी सांगितले की मृत मुलाचं तरूणीवर एकतर्फी प्रेम होतं. मात्र तरूणीने त्याला नाकारलं होतं दरम्यान तरूणीचं लग्न दुसरीकडे ठरल्याने विक्कीने तिच्या सासरच्या लोकांना काहीही Message पाठवून तिला बदमान केलं होतं त्यामुळे तरूणीच्या घरातील लोकांना विक्कीच्या घरातील लोकांकडे तक्रार देखील केली होती.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

2 days ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

6 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

7 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago