ताज्याघडामोडी

”सगळ्यात भामटा माणूस असेल तर तो ग्रामसेवक,तुम्हाला कधी मूर्ख बनवेल सांगता येत नाही !”

मुख्यमंत्र्यांकडे आमदाराविरोधात तक्रार

शिवसेना आमदार संजय शिरसाट  यांनी ग्रामसेवकांच्या बाबतीत औरंगाबाद  शहरात झालेल्या महिला सरपंच परिषदेत बोलताना बोलताना ‘एक लक्षात ठेवा, सगळ्यात भामटा माणूस असेल तर तो ग्रामसेवक. तुम्हाला तो कधी मूर्ख बनवेल सांगता येत नाही. तो तुमचे ऐकतो असे दाखवतो, मात्र बाहेर गेल्यास सरपंचांच्या सांगण्यावरून केले असे सांगत स्वतःच्या अंगावर काही येऊ देत नाही.’ त्यामुळे महिला सरपंचांनी त्यांच्यापासून दूर आणि सावध रहावं, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. 

आपण हे वक्तव्य आपल्या अनुभवावरून केले असून काही ग्रामसेवक चांगले काम करत असतील मात्र मला आलेल्या अनुभवावरून मी ते वक्तव्य केले. यावर मी ठाम असल्याचेही ते म्हणाले.पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावरती त्यांनी माध्यम प्रतिनिधी समोर सांगितले.

आमदार संजय शिरसाट  यांच्या वक्तव्यावरती महाराष्ट्र ग्रामसेवक युनियनचे राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे म्हणाले ‘जिल्हाधिकारी, तहसील कार्यालयात आम्ही 27 हजार 536 ग्रामपंचायतींचं कामकाज ठप्प केलं आहे तसेच शिरसाट यांनी विनाशर्त माफी मागावी. तसेच मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री उध्द्व ठाकरे यांनी  आमदारांना सक्त ताकीद द्यावी. ग्रामसेवकांबद्दल समाजात गैरसमज निर्माण करणारे वक्तव्य केल्याबद्दल त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला जावा, अशी मागणीही त्यांनी केली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago