प्रियकर पैशांची मागणी पूर्ण करत नसल्याचा राग येऊन प्रेयसीने ऐन दिवाळीत आपल्याच हाताने विष पाजल्याची घटना जालन्यात घडली आहे. विष पोटात गेल्याने चार दिवसांपासून उपचार घेत असलेल्या प्रियकराने शुद्धीवर आल्यानंतर या संदर्भात कदीम जालना पोलीस ठाण्यात प्रेयसी महिलेविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल केली. या प्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याविषयी पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, रमेश नाथाराम घुगे याने फिर्याद दिली आहे. रमेशचा मंडप डेकोरेशनचा व्यवसाय असून त्यातून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतोय शहरातील शिवनगर भागातील एका अंगणवाडी सेविका महिलेसोबत त्याचे मागील दीड वर्षांपासून प्रेमसंबंध होते. सदर महिलेच्या घरी लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तूंसह अन्य सामान तो खरेदी करून देत असे. अशा प्रकारे मागील दीड वर्षात प्रेयसीने आपल्याला मानसिक त्रास देऊन पाच लाख रुपये घेतले असल्याची माहिती रमेशने पोलिसांना दिली.
प्रेयसीने आपल्याकडे सीडीपीओ पदाच्या प्रमोशनसाठी दहा लाख रुपये हवे आहेत, अशी मागणी केली. तसेच तुला पैसे प्रिय आहेत का मी असा प्रश्न विचारत किचनमधून आणलेला एक ग्लास पाणी त्याला पाजले. ते पाणी प्यायल्यानंतर रमेशला उलट्या होऊ लागल्या.उलट्या होऊ लागल्याने रमेश त्या घरातील सिंकजवळ गेला. तेव्हा त्याला तिथे उंदिर मारण्यासाठी वापरण्यात येणारे औषध दिसले. त्यामुळे प्रेयसीने जीवे मारण्यासाठी विष पाजल्याचे लक्षात आले.
मात्र जास्तच उलट्या होत असल्याने प्रेयसीने कामावरील मुलाला बोलावले व म्हणाली, आता हा माझ्या काहीच कामाचा नाही, याला घेऊन जा.. कामावरच्या मुलाने रमेशला जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केले. शुद्धावर आल्यानंतर रमेश घुगे याने रविवारी प्रेयसीविरुद्ध तक्रार दिली आहे. याप्रकरणी पोलीस तपास सुरु आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…