भारतीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या 6 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. कार्यकाळ संपुष्ठात येत असला तरी सोलापूर आणि अहमदनगर वगळता मुंबईतील 2, कोल्हापूर, धुळे नंदुरबार, अकोला बुलडाणा वाशिम, नागपूर, या 6 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. रामदास कदम, भाई जगताप, सतेज पाटील, अमरिश पटेल, गिरीश व्यास, गोपालकिशन बाजोरिया यांच्या जागांवर निवडणूक होणार आहे.
यामध्ये मुंबईतील दोन जागा आहेत. तर कोल्हापूर, धुळे, अकोला आणि नागपूर या मतदारसंघात निवडणूक होणार आहे. विधानपरिषद सदस्यांची मुदत संपत आली असल्यामुळे या निवडणुका घेण्यात येत आहे. 6 जागांवरील सर्व सदस्यांची विधानपरिषदेवरील मुदत ही 1 जानेवारी 2022 रोजी संपणार आहे.
विधानपरिषदेची मुदत डिसेंबरमध्ये संपणाऱ्या नेत्यांमध्ये मुंबईतून शिवसेना नेते रामदास कदम, काँग्रेसचे भाई जगताप, काँग्रेसचे नेते सतेज पाटील, भाजपचे अमरिश पटेल, शिवसेनेचे गोपी किशन बाजोरिया, गिरीश व्यास, भाजपचे प्रशांत परिचारक, अरुण जगताप या नेत्यांचा समावेश आहे.
अधिसूचना जाहीर : 16 नोव्हेंबर
अर्ज दाखल करण्याचा दिनाक: 23 नोव्हेंबर
अर्जांची छाननी: 24 नोव्हेंबर
अर्ज मागे घेण्याची मुदत: 26 नोव्हेंबर
मतदान : 10 डिसेंबर (सकाळी 8 ते 4)
मतमोजणी : 14 डिसेंबर
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…