आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीनंतर फटाके फोडणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र, फटाके फुटले नाहीत आवाज झाला नाही, असं नवाब मलिक म्हणाले. यांचा बॉम्बस्फोटातील आरोपींशी संबध असल्याचं चित्र उभं करण्याचा प्रयत्न केला गेला. देवेंद्र फडणवीस तुम्ही 1999 ला या शहरात आलात. यापूर्वी गोपीनाथ मुंडे नेते होते. त्यांनी देखील अशाचं प्रकारचे अनेक आरोप केले होते. गेल्या 62 वर्षांच्या जीवनात किंवा लोकप्रतिनिधी झाल्यानंतर 26 वर्षांच्या काळात कोणी आरोप करु शकलं नाही. मात्र, तुम्ही माझ्यावर कवडीमोल दरानं जागा खरेदी केल्याचा आरोप केला. तुम्हाला माहिती देणारे व्यक्ती कच्चे खेळाडू असल्याचा पलटवार नवाब मलिक यांनी केला. मीच तुम्हाला कागदपत्रं दिली असती, असं नवाब मलिक म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी वाढवून बॉम्ब स्फोटाचा उल्लेख करण्याचा प्रयत्न केला. सरदार वली खानचा उल्लेख केला. देवेंद्र फडणवीसांना माहिती देणाऱ्यांनी माहिती दिली नाही की सरदार वली खानचं घर आहे. सरदार वली खानचे वडील गोवावाला कम्पाऊंडमध्ये वॉचमनचं काम करतात.ज्यावेळी मुनिरा पटेल यांच्याकडून जमीन घेतली तेव्हा सरदार वली खाननं 300 मीटरवर नाव चढवलं होतं. ते पैसे देऊन सरेंडर करण्याचं काम केलं. तिथं आमची दुकानं आहेत. गोवावाला बील्डिंगमधील संपत्ती त्यावेळी आमची होती. बिअर बार देखील तिथं होता, मुस्लीम समाजाच्या दबावामुळं आम्ही बिअर बार सरेडंर केला, असं नवाब मलिक म्हणाले. खान कुटुंब आणि पठाण कुंटुंबानं सातबाऱ्यावर नाव चढवलं होतं ते कमी कऱण्याचं काम केलं.
देवेंद्र फडणवीस यांनी या गोष्टी वाढवून सांगण्याचा प्रयत्न केला. 62 वर्षात कोणीही आरोप करु शकलं नाही. कोणत्याही यंत्रणेसमोर जायचंय ते जावा. माझी प्रतिमा मलीन करण्यासाठी जे करायचंय ते करा. सरकारी दप्तरात त्याची नोंद आहे. झुठ बोलो जरा ढंग से बोलो, असा टोला नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला. देवेंद्र फडणवीस तुम्ही अंडरवर्ल्डचा मुद्दा पुढं आणलाय तर मी उद्या सकाळी अंडरवर्ल्डचा हायड्रोजन बॉम्ब फोडणार आहे, असं नवाब मलिक म्हणाले.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…