फॅबटेकच्या ३ विद्यार्थ्यांची टीसीएस या नामांकित कंपनी मध्ये निवड

येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पस – कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चच्या कॉम्प्युटर  इंजिनिअरिंग  विभागातील निशिगंधा संजय अदाटे व प्रतीक धम्मा मागाडे तसेच सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील तेजल रामचंद्र मिसाळ  या तीन  विद्यार्थ्यांची  टीसीएस  या नामांकित सॉफ्टवेअर कंपनी मध्ये निवड झाली असून त्यांना  वार्षिक ३.६  लाखाचे पॅकेज मिळाले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. शेंडगे यांनी दिली.

टीसीएस  हि अंतरराष्ट्रीय  आयटी कंपनी असून ती एक भारतातील दिगज्ज कंपनी आहे. भारतासह ४६ देशांमध्ये या कंपनीचा विस्तार आहे. या कंपनीमध्ये निवड झालेले  विद्यार्थी यांना कॉलेज कडून ओटू ब्रिथिंग  व क्यू स्पायडर  या ट्रेनिंग संस्थेमार्फत  ट्रेनिंग दिल्यामुळे,  विद्यार्थ्यांना कंपनीसाठी आवश्यक असणारे कौशल्य विकसित झाल्यामुळे  निवड प्रक्रिये मध्ये याचा फायदा होत असल्याची माहिती प्लेसमेंट अधिकारी डॉ. साहेबगौडा  संगनगौडर यांनी दिली.

     या निवड झालेल्या  विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन व मॅनेजिंग  डायरेक्टर मा. श्री. भाऊसाहेब रुपनर यांनी  अभिनंदन करून पुढील कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे कार्यकारी संचालक श्री अमित रुपनर,  श्री. दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर बी. शेंडगे, फार्मसीचे प्राचार्य डॉ.संजय बैस, पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. शरद पवार, कॉम्प्युटर  सायन्सचे  विभाग प्रमुख प्रा. पराग दौंडे,सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. अभिमान कनसे, ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी डॉ. साहेबगौडा  संगनगौडर सर्व विभागांचे प्लेसमेंट कॉ-ओर्डीनेटर, सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक आदी उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाची उज्जल यशाची परंपरा कायम.

प्रथम वर्ष च्या निकालामध्ये जिल्ह्यात अव्वल महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या…

24 seconds ago

पंढरपूर शहर तालुक्यातील शासकीय कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात यावी

संभाजी ब्रिगेडची प्रांताधिकारी पंढरपूर यांच्याकडे निवेदन देत मागणी    स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती…

5 days ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग चा ९२%निकाल

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या बी.एस्सी नर्सिंगच्या हिवाळी २०२५ परीक्षेत कर्मयोगी…

3 weeks ago

१९ एप्रिल रोजी शिवस्वराज्य पंढरीरत्न राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

पंढरपूर येथे आयोजीत पुरस्कार वितरण सोहळा या मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.या…

4 weeks ago

मा.आ.प्रशांत परिचारक यांना विधान परिषद नाही तर विधानसभेचे आमदार करण्यासाठी भाजपचे वरिष्ठ आग्रही ?

सोलापूर जिल्ह्यातून विधान परिषदेसाठी राम सातपुते,बाळराजे पाटील यांचे नाव आघाडीवर  परिचारक यांनी तिरंगी लढतीत दोन पराभव…

1 month ago

भावनिक क्षणांत रंगला सिंहगडमध्ये अंतिम वर्षाचा निरोप समारंभ

एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपुर येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग व सिव्हिल इंजिनिअरिंग…

1 month ago