पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची हत्या करून पतीने स्वतःचा गळा कापून घेतल्याची खळबळजनक घटना नुकतीच समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीने याच विषयावरून झालेल्या वादानंतर तिची हत्या केली. पत्नीचा मृतदेह पाहून धक्का बसल्यानंतर त्याने आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला.
असा वाढला संशय
बिहारच्या जमुई भागात राहणाऱ्या छोटेलाल सोरेन यांचं संगीता हेंब्रम याच्याशी लग्न झालं होतं. मात्र लग्नानंतर काही दिवसांतच त्यांच्यात भांडण व्हायला सुरुवात झाली. भांडणाचं कारण होतं विवाहबाह्य संबंधांचा संशय. पती छोटेलालला पत्नीच्या चारित्र्यावर संशय यायला सुरुवात झाली होती. छोटेलालला त्याच्या संशयाला पुष्टी देणारा कुठलाही पुरावा मिळत नव्हता, मात्र तरीही त्याचा संशय बळावत चालला होता. त्यावरून त्यांची सतत वादावादी आणि भांडणं होत होती.
वादातून केला हल्ला
घटनेच्या दिवशी याच विषय़ावरून छोटेलाल आणि संगीता यांच्यात भांडण सुरू झाल्याचं शेजारी सांगतात. विवाहबाह्य संबंधांच्या मुद्द्यावरून छोटेलालनं संशय घेतल्यानंतर चिडलेल्या संगीतानं त्याला प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे पिसाळलेल्या छोटेलालनं आक्रमक होत तिच्यावर हल्ला केला. त्याला प्रत्युत्तर दिल्यानंतर तो अधिकच चिडला आणि त्याने गळा दाबून संगीताचा खून केला.
स्वतःवरही केले वार
संगीताचा खून केल्यानंतर छोटेलालनं धारदार शस्त्रांनी स्वतःवरही वार केले. ब्लेडनं स्वतःच्या गळ्यावर वार करत त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. शेजाऱ्यांनी या घटनेची कल्पना पोलिसांना दिल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी पत्नीच्या मृतदेहावर अर्धमेल्या अवस्थेत छोटेलाल पडल्याचं त्यांना आढळून आलं.
पोलीस कारवाई सुरू
पोलिसांनी संगीताचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टेमसाठी पाठवून दिला आहे. तर छोटेलालला उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्याची तब्येत आता सुधारत असून लवकरच अधिक माहिती त्याच्याकडून घेतली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांनी छोटेलालवर खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. केवळ चारित्र्याच्या निराधार संशयावरून पतीने पत्नीची हत्या केल्यामुळे एका सुखी संसासाची राखरांगोळी झाल्याबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…