ताज्याघडामोडी

आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

जिल्हा बँकेच्या निवडणूक वादातून आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याच्या अंगावर गाडी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पडळकर यांच्यावर आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

याबाबत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राजू नानासो जानकर (वय 29, रा. भेंडवडे, ता. खानापूर) यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. जानकर यांच्या फिर्यादीनुसार आमदार पडळकर आणि त्यांच्या समर्थकांनी रविवारी सायंकाळी आटपाडी पोलीस ठाण्यासमोर गाडी अंगावर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता.

याबाबत अधिक माहिती अशी की, सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून सध्या आटपाडीत आमदार गोपीचंद पडळकर आणि महाविकास आघाडीत संघर्ष सुरू झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते राजू जानकर यांचे मेहुणे शिवसेनेच्या उमेदवारास मदत करीत असल्याच्या रागातून आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांचे भाऊ ब्रह्मानंद पडळकर यांनी मारहाण केल्याचा दावा जानकर यांनी केला आहे.

याबाबत विचारणा केली असता, आमदार पडळकर यांनी दमदाटी केली, तसेच आटपाडी पोलीस ठाण्यासमोर येण्याचं आव्हान दिलं. त्यानंतर आटपाडी पोलीस ठाण्यासमोर आलेले राजू जानकर यांच्या अंगावर गाडी घालून आमदार पडळकर यांनी त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला, असा आरोप जानकर यांनी केला आहे.

जानकर यांच्या फिर्यादीनुसार आटपाडी पोलिसांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह गणेश भुते या दोघांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

2 weeks ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 weeks ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

4 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

4 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

1 month ago