ताज्याघडामोडी

गोपीचंद पडळकर यांनी अंगावर गाडी घातली; शिवसेना कार्यकर्त्याचा आरोप

जिल्हा बँकेच्या मतदानासाठी ठराव करण्याच्या वादातून भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि शिवसेना, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये रविवारी सायंकाळी जोरदार राडा झाला. आमदार पडळकर यांनी गाडी अंगावर घातल्याचा आरोप शिवसेनेचे कार्यकर्ते राजू जानकर यांनी केला आहे, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संतप्त कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर जोरदार दगडफेक केली. या घटनेनं आटपाडीत प्रचंड तणाव निर्माण झाला असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून सुरू झालेला शाब्दिक वाद आता मारामारीपर्यंत पोहोचला आहे. आटपाडीतील शिवसेनेचे कार्यकर्ते राजू जानकर यांच्या मेहुण्याने जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून आमदार गोपीचंद पडळकर आणि ब्रह्मानंद पडळकर यांनी फोन करून राजू जानकर यांना दमबाजी केली, असा आरोप आहे.

‘तुला बघून घेतो, असं म्हणत मला पडळकर यांनी आटपाडी पोलीस ठाण्याच्या चौकात बोलावले. रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह आटपाडी पोलीस ठाण्यासमोर चौकात पोहोचलो. थोड्याच वेळात आमदार पडळकर हे कार्यकर्त्यांसह पोलीस ठाण्यासमोर पोहोचले. आमदार पडळकर यांनी भरधाव गाडी अंगावर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला,’ असा आरोप जानकर यांनी केला आहे.

या घटनेत जानकर यांचा पाय मोडला असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी दगडफेक करत आमदार गोपीचंद पडळकर यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. आमदार पडळकर आणि त्यांचे भाऊ ब्रह्मानंद पडळकर हे भरधाव वेगाने निघून गेले. यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी पडळकर समर्थकांच्या तीन गाड्यांची तोडफोड केली. पोलिसांनी तातडीने धाव घेऊन दोन्ही गटाच्या समर्थकांना अडवण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, आटपाडीतील राजकीय संघर्ष हिंसक वळणावर पोहचल्याने पोलिसांनी शहरात बंदोबस्त वाढवला आहे. जखमी राजू जानकर यांच्याकडून फिर्याद देण्याचे काम सुरू असून आमदार पडळकर यांनीच अंगावर गाडी घातल्याचा जबाब त्यांनी नोंदवला आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

2 weeks ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

3 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 weeks ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

4 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

1 month ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

1 month ago