गुन्हे विश्व

एकाच घरामध्ये पुरुषासह महिलेचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ

पुण्यातील मुंढवा परिसरातील केशवनगर  येथील कुंभारवाडा  येथे एका घरामध्ये एका पुरूषासह महिलेचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. हा धक्कादायक प्रकार दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला असून मुंढवा पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

शरद भुजबळ (47) आणि हेमा (43 – ही नेपाळी महिला आहे) यांचे मृतदेह आढळून आले आहेत. शरद भुजबळ हा एनआयबीएम रोडवरील एका ट्रव्हल्समध्ये ड्रायव्हर म्हणून काम करत होता.

शरद याच्याशी संपर्क होत नसल्याने त्याच्या मित्राने त्याचे घर गाठले. मित्र जेव्हा घरी आला तेव्हा हा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, घरातील गॅस चालू होता पण सिलेंडर संपलेले होते. घराच्या शेजारी केमिकलचे कॅन आढळून आले आहेत.

शरद आणि हेमा यांच्या नाकातून रक्त येत असल्याचं देखील पोलिसांना दिसलं आहे. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. मुंडवा पोलिस या घटनेचा संपूर्ण तपास करत आहे. या दोघांनी आत्महत्या केली की कुठला घातपात आहे याचा शोध पोलिस घेत आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

ऐतिहासिक यमाई तलाव होणार प्रदूषणमुक्त !

​माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या विशेष प्रयत्नांतून १५ कोटींच्या सिव्हेज पंपिंग स्टेशनचे काम प्रगतीपथावर पंढरपूर:…

4 days ago

यशवंतराव चव्हाण (यमाई) तलावात पाणी सोडण्यास सुरुवात

नगराध्यक्षा डॉ. प्रणिता भगीरथ भालके यांच्या मागणीला यश पंढरपूर : उजणी जलाशय पूर्ण क्षमतेने भरलेले…

6 days ago

स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यस्मरणानिमित्त मोफत नेत्र तपासणी शस्त्रक्रिया व आरोग्य तपासणी शिबिर : प्रणव परिचारक

11 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट पर्यंत पंढरपूर तालुक्यात दहा ठिकाणी होणार शिबिर कर्मयोगी श्रद्धेय स्व.…

6 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘प्रोटोटाईप/प्रोसेस डिझाईन अँड डेव्हलपमेंट’ विषयावर कार्यशाळा उत्साहात संपन्न.

पंढरपूर | प्रतिनिधी सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर…

6 days ago

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी येथे विद्युत अभियांत्रिकी विभागाचा पालक मेळावा उत्साहात संपन्न

सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर…

1 week ago

भाजी मंडईतील विक्रेत्यांच्या समस्या जाणून घेत नगराध्यक्षा डॉ.प्राणिताताई भालकेयांची प्रत्यक्ष पाहणी.

पंढरपूर : पंढरपूर शहरातील नवी पेठ भाजी मंडई परिसरात आज पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा डॉ.…

1 week ago