ताज्याघडामोडी

धक्कादायक! दिवाळीली माहेरी न पाठवल्याने पत्नीची आत्महत्या, धक्क्याने पतीनेही संपवले जीवन

दिवाळीला जाण्यासाठी पतीने विरोध केल्यानंतर पत्नीने घरातच छताला गळफास घेऊन आत्महत्या केली तर पत्नी आपल्याला सोडून गेल्याने हादरून गेलेल्या पतीने देखील दुसऱ्या दिवशी गळफास घेऊन आत्महत्या केली या घटनेने संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला घटना घडल्यामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे. ही घटना कळमनुरी तालुक्यातील पोत्रा येथे घडलीय.

दिवाळीला जाण्यासाठी पतीने विरोध केल्यानंतर पत्नीने घरातच छताला गळफास घेऊन आत्महत्या केली तर पत्नी आपल्याला सोडून गेल्याने हादरून गेलेल्या पतीने देखील दुसऱ्या दिवशी गळफास घेऊन आत्महत्या केली या घटनेने संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला घटना घडल्यामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे. ही घटना कळमनुरी तालुक्यातील पोत्रा येथे घडलीय.

काजल सोनू उर्फ भीमराव घोगरे(२०) सोनू उर्फ भीमराव रामा घोगरे (२२) अशी मयताची नावे आहेत. काजल आणि सोनू चे वर्षभरापूर्वी लग्न झाले होते. त्यांचे एकमेकांवर फार प्रेम होते. ते नेहमीच एकाच ताटामध्ये जेवण करत असत. दोघे अजिबात एकमेकाला सोडून राहत नसत. परंतु दिवाळी सणानिमित्त माहेरी जाण्यासाठी पत्नीला पतीने विरोध केल्यानंतर पत्नीला राग सहन झाला नाही तिने थेट घरातच छताला गळफास लावून आत्महत्या केली.

या घटनेने पती सोनू उर्फ भीमराव हा चांगलाच हादरून गेला, अन त्याने देखील शेतशिवारात आत्महत्या केली. त्याने आत्महत्या केल्याचे आज उघडकीस आले. दोघांनीही आत्महत्या केल्याचे उघड झाल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातेय.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

5 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago