यंदा कार्तिकी वारी भरणार

अनेक दिवसांपासून ज्या निर्णयाची वाट संपुर्ण महाराष्ट्रातील वारकरी पाहात होते तो निर्णय अखेर राज्य सरकारने घेतला असून आता सर्व वारकऱ्यांना आपल्या लाडक्या विठूरायाच्या दर्शनासाठी चालत कार्तिकी वारीला  जाण्याची परवानगी मिळाली आहे.

कोरोना निर्बंध शिथिल झाल्यानंतर पहिल्यांदाच कार्तिकी वारी 15 नोव्हेंबरला होणार आहे. दरम्यान या वारीला मोठी गर्दी अपेक्षित असल्यानं जिल्हा प्रशासनानंसह आपत्ती व्यवस्थापन तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाकडे परवानगीसाठी प्रस्ताव पाठवण्याची तयारी सुरू केली आहे. तसेच राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्यामुळे कार्तिकी वारीसाठी स्वतंत्र परवानगीची आवश्यकता नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सांगितलं आहे.

17 एप्रिल 2020 पासून वारकऱ्यांना एकाही वारीला जाण्याची परवानगी मिळाली नव्हती मात्र आता आपल्या लाडक्या विठूरायाच्या दर्शनासाठी जाण्याची संधी मिळणार असल्यानं सर्व वारकऱ्यांमध्ये आनंदाच वातावरण आहे.

आषाढी, कार्तिकी, चैत्र, माघ या चार वारींच्या निमित्ताने लाखो वारकरी पंढरीत दाखल होतात. मात्र मागील काही काळापासून कोरोनाच्या पार्श्वभूनीवरती पायी वारी सोबत चालत जाण्यासाठी सरकारने बंधने घातली होती.तसेच कोरोनाच्या दोन लाटेंमध्ये आषाढी वारीला मानाच्या पालख्या ST बसेसमधून पंढरीत दाखल झाल्या होत्या. त्यावेळी ठराविक वारकरीच वारीत सहभागी झाले होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

5 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago