एका सुपरस्टार अभिनेत्यासोबत आज एक विचित्र आणि जिवघेणा प्रकार घडला आहे. हा अभिनेता आणि त्याची संपू्र्ण टीम जेव्हा बंगळूर विमानतळावर पोहोचले, तेव्हा एका व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झालं नसलं, तरी इतका कडेकोट बंदोबस्त असताना देखील असा हल्ला केल्याने लोकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा हल्ला तमिळ अभिनेता विजय सेतुपतीवर झाला आहे.
हल्लेखोर धावत आला
‘आयएएनएस’ या वृत्तसंस्थेशी बोलताना अभिनेत्याच्या जवळच्या सहाय्यकाने ही घटना बुधवारी घडल्याचे सांगितले. वृत्तानुसार, विजय सेतुपती विमानतळावर उपस्थित होते, तेव्हा एका अज्ञात व्यक्तीने मागून धावत येऊन अभिनेत्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये विजय सेतुपती विमानतळातून बाहेर पडताना दिसत आहेत, तर हल्लेखोर मागून त्याच्याकडे धावताना दिसत आहेत.
तो माणूस दारूच्या नशेत होता
एजन्सीच्या अहवालात असे म्हटले आहे की, अज्ञात हल्लेखोर मद्यधुंद अवस्थेत होता आणि विमानतळावर उपद्रव निर्माण करत होता. घटनेनंतर लगेचच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हल्लेखोराला पकडले. यादरम्यान दोन्ही बाजूंमध्ये किरकोळ वादावादीही झाली.
या घटनेने राष्ट्रीय पुरस्कार विजेते विजय सेतुपती दुखावले आहेत. मात्र, या हल्ल्याचे कोणतेही ठोस कारण अद्याप समोर आलेले नाही.
एका मिडीया अहवालात असे म्हटले आहे की, विजय सेतुपतीचा एक वैयक्तिक कर्मचारी विमानतळावर अभिनेत्यासाठी रस्ता मोकळा करत होता, त्यादरम्यान त्याने चुकून त्या व्यक्तीला धक्का दिला. रागाच्या भरात या अज्ञात व्यक्तीने त्यांचा पाठलाग करून संधी साधून मागून हल्ला केला. व्हिडीओमध्ये हा माणूस विजय सेतुपतीला लाथ मारताना दिसत आहे.
सुरक्षा कर्मचार्यांनी अटक केल्यानंतर त्या व्यक्तीने नंतर माफी मागितली आणि त्यानंतर हे प्रकरण अशाप्रकारे मिटले, असे सांगितले जाते. विजय सेतुपती यांनी या व्यक्तीवर कोणतीही कारवाई केली नाही.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…