सुमारे 13 तासांच्या चौकशीनंतर अटक करण्यात आलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. त्यांच्या अटकेनंतर एक नवीन खुलासा झाला आहे की, ईडीला अशा 13 कंपन्यांविषयी माहिती मिळाली आहे, ज्या अनिल देशमुख, त्यांचे मुलं सलिल आणि ऋषिकेशच्या थेट कंट्रोलमध्ये होत्या. यासोबतच 14 अशा कंपन्या आहेत, ज्या अनिल देशमुखांच्या नीकटवर्तीयांच्या कंट्रोलमध्ये सुरू होत्या. ईडीच्या सूत्रांनुसार, यामधून काही शेल कंपन्यांचा देखील समावेश आहे.
ईडीच्या तपासात या कंपन्यांमध्ये वारंवार व्यवहार होत असल्याचे समोर आले आहे. अनिल देशमुख यांच्या बेकायदेशीरपणे कमावलेल्या पैशाचा वापर करण्यासाठी या संस्थांचा वापर करण्यात आल्याचा दावा ईडीच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयात केला आहे.
नंतर या संस्था आणि व्यक्तींच्या विविध बँक खात्यांची तपासणी करण्यात आली आणि हे कळाले की, देशमुखांच्या कुटुंबातील सदस्यांद्वारे अप्रत्यक्षपणे नियंत्रित कंपन्यांकडून पैशांची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. याची बॅलेन्स शीट आणि बँक अकाउंट स्टेटमेंट तपासल्यानंतर संकेत मिळतो की, यामधून काही संस्थांचा कोणताही वास्तविक व्यवसाय नाही आणि याचा उपयोग केवळ फंडच्या रोटेशनसाठी करण्यात येत आहे. ईडीने या संबंधीत अनेक दस्तावेजही न्यायालयात पुरावे म्हणून सादर केले आहेत.
याप्रकरणी देशमुख यांना अटक करण्यात आली आहे
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी लावलेल्या 100 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणातही अनिल देशमुख आरोपी आहेत. त्यांच्याविरुद्ध सीबीआय चौकशी करत आहे. खरेतर ईडीने त्यांची अटक अँटिलिया केसमध्ये अटकेत असलेले बरखास्त पोलिस अधिकारी सचिन वाझेंद्वारे वसुली केलेल्या 4.7 कोटी रुपयांच्या प्रकरणात केली आहे.
हे पैसे सचिन वाझेंनी मुंबईचे अनेक रेस्तरॉ आणि बार ओनर्सकडून घेतले आणि देशमुखांचे स्वीय सचिव (पीएस) संजीव पलांडे आणि स्वीय सहाय्यक (पीए) कुंदन शिंदेंना दिले होते. दोघांना ईडीने अटक केली आहे. तपासात समोर आले आहे की, या पैशांना एका शेल कंपनीच्या नावावर ट्रान्सफर करण्यात आले आणि नंतर नागपुरातील एका चॅरिटेबल ट्रस्ट श्री साई शिक्षण संस्थेच्या नावावर ट्रान्सफर करण्यात आले.
ही ट्रस्ट देशमुखांचे कुटुंब चालवत आहे. याला मनी लॉन्ड्रिंग मानत ईडीने देशमुखांना अटक केली आहे. या प्रकरणी त्यांची पत्नी आणि मुलाला देखील चौकीसाठी ईडीने समन पाठवला आहे. मात्र ते अद्याप हजर झालेले नाहीत.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…