ल्हेरमध्ये 19 वर्षीय तरुणी बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पीडित तरुणी मूळ उत्तर प्रदेशातील झाशीची रहिवासी असून ती मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे राहून पोलीस भरती परीक्षेची तयारी करत होती. यावेळी एका फेसबुक फ्रेंडने नोकरीसाठी मुलाखत देण्याच्या बहाण्याने ग्वाल्हेरला बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे.पोलिसांना मिळालेल्या तक्रारीनुसार पीडित तरुण आणि आरोपी तरुण या दोघांची फेसबुकवर 2 महिन्यांपूर्वी मैत्री झाली होती. तरुणीच्या दाव्यानुसार आरोपीने तिला नोकरीच्या मुलाखतीच्या बहाण्याने ग्वाल्हेरला बोलावले. ती ग्वाल्हेरला आल्यावर मुलाने तिला बहोदापूर येथील भाड्याच्या खोलीत नेले आणि झोपेच्या गोळ्या मिसळलेले शीतपेय दिले. ती बेशुद्ध झाल्यावर तरुणाने तिच्यावर बलात्कार केला आणि तिचा व्हिडीओ शूट केला.
पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, सुमारे दोन महिन्यांपूर्वी आरोपी विद्यार्थ्याने फेसबुकवर संबंधित तरुणीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. दोघांमध्ये मोबाईलवर संवाद सुरू झाला. तरुणीने त्याला आपल्यासाठी एखादी चांगली नोकरी शोधण्यास सांगितले. त्यानुसार एका चांगल्या नोकरीच्या मुलाखतीसाठी या मुलाने विद्यार्थिनीला 19 ऑक्टोबर रोजी ग्वाल्हेरला बोलावले.विद्यार्थिनीच्या तक्रारीत म्हटले आहे की, रविवारी आरोपीने तिला कागदपत्रं देण्याच्या बहाण्याने पुन्हा बोलावले. त्याने तिला पुन्हा तिच्या खोलीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. बलात्कारानंतर तरुणीला डीआरपी लाइनच्या गेटवर सोडून पळून गेला. दोन वेळा अत्याचार केल्यानंतरही तरुणाने तिची कागदपत्रे परत केली नाहीत. बहोदापूर पोलिसांनी मुलीची वैद्यकीय तपासणी केली आहे. आरोपी आवेशला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक श्योपूरला रवाना झाले आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…