उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबधित कोणत्याही संपत्तीवर आयकर विभागाने टाच आणलेली नाही. तसेच अजित पवारांशी संबंधित कुठल्याही संपत्तीवर टाच किंवा नोटीस नाही, अजित पवारांच्या वकिलाने खुलासा केला आहे.
तसेच त्यासंदर्भातील कोणतीही नोटीस अजित पवार यांना प्राप्त झालेली नाही. असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वकील प्रशांत पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे. आयकर विभागाच्या पत्राला कायदेशीर उत्तर देणार असल्याचं अजित पवारांच्या वकिलांनी सांगितलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुस-या मंत्र्याला आयकर विभागाने मोठा झटका दिला होता. मंगळवार उपमुख्यमंत्री अजित पवारांना आयकर विभागाने नोटीस पाठवली. अजित पवारांच्या नातेवाईकांशी संबंधित कोट्यवधींची मालमत्ता जप्त करण्यात आली. कारवाई केलेली संपत्ती ही बेकायदेशीर नाही हे 90 दिवसांत सिद्ध करा असं आयकरकडून सांगण्यात आलं होतं. तोपर्यंत ही संपत्तीची विक्रीही करू शकत नाही असा आदेश आयकरकडून देण्यात आला आहे.
नवी दिल्लीतील 20 कोटींचा फ्लॅट
निर्मल हाऊस पार्थ पवार ऑफिसची किंमत 25 कोटी
जरंडेश्वर शुगर फॅक्टरी जवळपास 600 कोटी
गोव्यातील रिसॉर्ट जवळपास 250 कोटी
महाराष्ट्रातील 27 वेगवेगळ्या ठिकाणी जमिनी जवळपास 500 कोटी
या सगळ्या मालमत्ता आयकरने अटॅच केल्या आहेत. असं असताना आता अजित पवारांच्या वकिलांनी मोठा खुलासा केला आहे.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…