राजगडमधून एक दुखद घटना समोर आली आहे. येथे ऑनलाइन गेम च्या व्यसनामुळे एका तरुणाला जीव गमवावा लागला आहे. तरुणावर लाखोंचं कर्ज झालं होतं.
यामुळे त्रस्त झालेल्या तरुणाने ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. तरुणाचं लग्न झालं होतं आणि त्याला दोन मुलंही आहेत. ही घटना राजगडमधील पडोनिया गावातील आहे. येथे राहणारा विनोद दांगी याचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर सापडला.
कुटुंबीयांचं म्हणणं आहे की, विनोदला ऑनलाइन गेम खेळण्याचं व्यसन लागलं होतं. यामध्ये तो तब्बल 10 लाख रुपये हरला होता. यामुळे तो गेल्या काही दिवसांपासून शांत झाला होता. तीन पत्ती गेमचं व्यसन विनोद आपल्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता.
त्याला तीन बहिणी आहेत. त्याला ऑनलाइन गेम खेळण्याचं व्यसन लागलं होतं. कुटुंबीयांनी मना करून देखील तो गेम खेळणं थांबवत नव्हता. हळू हळू तो खेम हरू लागला आणि 10 लाख रुपये हरला.
कुटुंबीयांनी सांगितलं की, विनोद तब्बल महिनाभरापासून उदास आणि शांत राहू लागला होता.त्याला कर्ज फेडण्याची चिंता लागली होती. एकेदिवशी तो अचानक घरातून गायब झाला. यानंतर त्याचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर सापडला.
घरातील सदस्यांनी त्याची ओळख पटवली आहे. हे ही लव्ह, सेक्स, धोका! मित्रानेच केला विश्वासघात; अमरावतीत 20वर्षीय तरुणीवर बलात्कार मिळालेल्या माहितीनुसार, विनोद ऑनलाइन तीन पत्ती गेम खेळत होता. त्यात तो 10 लाख रुपये हरला होता.
विनोद गेम खेळण्यासाठी आजूबाजूच्या व्यापारींकडून पैसे उधार घेत होता. तो आपल्या दुकानात बसून दिवसभर गेम खेळत होता. तो विवाहित होता. त्याचे वडील शेतकरी होते आणि त्याची अनेक दुकानं आहेत.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…