राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केल्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारला दुसरा धक्का बसला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मालमत्तेवर आयकर विभागानं कारवाई सुरू केली असल्याची माहिती समोर येतेय. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार अजित पवारांशी संबंधित कोट्यावधींची संपत्तीवर जप्ती आणण्याचे आदेश दिले आहेत.
मागील काही दिवसांपासून अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीय हे आयकर विभागाच्या रडारवर आहेत. अजित पवार यांच्या बहिणींच्या घरी व पार्थ पवार यांच्या कार्यालयातही आयकर विभागानं छापेमारी केली होती. त्यानंतर आज आयकर विभागाकडून अजित पवारांना नोटिस देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
कोणत्या मालमत्तांवर कारवाई?
जरंडेश्वर साखर कारखाना- (जवळपास ६०० कोटी)
दक्षिण दिल्लीतील फ्लॅट- (जवळपास २० कोटी)
पार्थ पवार यांचे मुंबईतील कार्यालय -( जवळपास २५ कोटी)
गोव्यातील रिसॉर्ट- ( जवळपास २५० कोटी)
राज्यातील वेगवेगळ्या २७ जिल्ह्यातील जमीनी -( जवळपास ५०० कोटी)
दरम्यान, अजित पवार हे गेल्या काही दिवसांपासून आयकर विभागाच्या रडारवर आहेत. मागील महिन्यात आयकर विभागानं दोन रिअल इस्टेट ग्रुप आणि अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या घरी धाड टाकली होती. त्यानंतर जवळपास १८४ कोटी बेनामी मालमत्ता उघड झाली होती. आयकर विभागानं ७ ऑक्टोबर रोजी ७० हून अधिक ठिकाणी धाड टाकली होती. यावेळी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कार्यालयात व अजित पवारांच्या बहिणींच्या कंपन्यांवरही छापा मारला होता.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…