कोर्टीरोड परिसरात घरफोडी,सोन्या-चांदीचे दागिने,रोख रकमेसह टीव्ही लंपास

पंढरपूर शहर व शहरा लगतच्या उपनगरातून अगदी घरासमोर लावलेल्या दुचाकी चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले आहे अशातच आता कोर्टी रोड वरील परिचारक नगर येथील बंद घराचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने,देवतांच्या चांदीच्या मूर्ती तसेच ५ हजार रोख रक्कम व घरातील सोनी कंपनीचा एलसीडी टीव्ही लंपास केला आहे.

या बाबत पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात महेश बडवे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या सासुबाई स्मिता सुनिल जोशी वय-60ह्या परिचारक नगर प्लाँट नं.23 80/1/B शहनाई गार्डन चे पाठीमागे कोर्टी रोड पंढरपूर येथे एकट्याच राहत असुन त्या मुळच्या बार्शी येथील घोडेगल्ली येथे राहण्यास असतात अधुनमधुन एखाद्यावेळेस पंढरपूरला येतात.

दि.30/10/2021रोजी सकाळी 09/00वा.चे सुमारास त्यांचे शेजाऱ्याने फिर्यादीच्या मेव्हुणी सुवर्णा याना फोनवरुन तुमचे घर उघडे दिसत आहे अशी माहिती दिली असता फिर्यादी व त्यांचे साडू हे सदर घटनास्थळी गेले.त्यावेळी समोरील लोखंडी दरवाजा फाकुन आतील दरवाज्याचा कोंयडा तोडुन आत प्रवेश करुन चोरी केल्याचे दिसुन आले.सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम, अशा वस्तु अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. म्हणून माझी अज्ञात चोरट्याविरूध्द फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

11 minutes ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago