ताज्याघडामोडी

कोरोनाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करुन नियोजन करावे – प्रांताधिकारी गजानन गुरव

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर वारकरी व नागरिकांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने कार्तिकी यात्रेबाबत शासनाकडून निर्णय घेण्यात येईल. तथापि कार्तिक यात्रा भरविण्याबाबत शासनाकडून सूचना प्राप्त झाल्यास प्रशासनाने पुर्व तयारी म्हणून आवश्यक नियोजन करणे गरजेचे आहे. यासाठी  सर्व विभागने समन्वय राखून नियोजन करावे अशा सूचना प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिल्या.

               कार्तिक वारी पुर्व नियोजनाबाबत नवीन भक्त निवास  पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस,  उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम,  तहसिलदार  सुशिल बेल्हेकर, स्वप्निल रावडे, गटविकास अधिकारी  प्रशांत काळे, मुख्याधिकारी अरविंद माळी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले,  नायब तहसिलदार किशोर बडवे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.गिराम, पोलीस निरिक्षक, अरुण पवार, धनंजय जाधव यांच्यासह सर्व संबधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

                   यावेळी प्रांताधिकारी गुरव म्हणाले, कोरोनाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करुन सर्व संबधित विभागाने आपणास दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडण्यासाठी नियोजन करावे. नगरपालिकेने स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवठा, प्रदक्षिणा मार्गावरील आवश्यक ठिकाणी रस्ते दुरुस्ती,  शहरात वेळोवळी फवारणी करावी, चंद्रभागा वाळवंटात पुरेशा प्रकाश राहिल याबाबत नियोजन करावे,धोकादायक इमारतींवर ठळक सूचना फलक लावावेत. करावे तसेच मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा. मंदीर समितीने व नगरपालिकेने प्रदक्षिणा मार्ग, नदीपात्रात आवश्यक ठिकाणी बॅरकेंटींग करावे व अग्निशामक यंत्रणा कार्यरत ठेवावी .

               कार्तिकी यात्रा कालावधीत मंदीर समितीने  जादाचे पत्राशेड उभारावेत, दर्शन रांगेत ठिकठिकाणी सूचना फलक लावावेत. भाविकांना स्वच्छ पिण्याच्या व्यवस्था करावी. मंदीर समितीने शासकीय पुजेला उपस्थित राहणाऱ्या अधिकारी ,कर्मचारी तसेच संबधितांची आरोग्य तपासणी करुन घ्यावी. आरोग्य विभागाने शासकीय निवासस्थान व श्री विठ्ठल-रक्मिणी मंदीर  येथे तज्ञ डॉक्टरांसह वैद्यकीय पथकाची नेमणूक करावी. तसेच फिरते वैद्यकीय पथक, ऑक्सिजन, रक्तपुरवठा तसेच मुबलक औषधसाठा उपलब्ध राहील याबाबत नियोजन करावे अशा सूचनाही प्रांताधिकारी  गुरव यांनी यावेळी दिल्या.

पोलीस प्रशासनाने वारी कालावधीत सुरक्षततेच्या दृष्टीने योग्य नियोजन करावे,  महावितरणने यात्रा कालावधीत सुरक्षित व अखंडीत वीज पुरवठा राहील यांची दक्षता घ्यावी. अन्न व औषध विभागाने प्रसाद विक्री केंद्र, हॉटेल्स यांची वेळावेळी तपासणी करावी. अशा सूचनाही प्रांताधिकारी गुरव यांनी दिल्या. यावेळी बैठकीत राज्य परिवहन महामंडळ, रेल्वे विभाग, उपप्रादेशिक परिवहन, राज्य उत्पादन शुल्क आदी विभागांचा आढावा घेण्यात आला. बैठकीनंतर  पत्राशेड,  दर्शन रांग, ६५ एकर, विठ्ठलमंदीर व मंदीर परिसर आदी ठिकाणची पाहणी प्रांताधिकारी यांनी केली. यावेळी संबधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचनाही त्यांनी दिल्या.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

18 hours ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

18 hours ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago