एका खासगी हॉटेलच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी एसबीआयचे माजी अध्यक्ष प्रतीप चौधरी यांना रविवारी जैसलमेर पोलिसांनी दिल्लीतील घरातून अटक केली. तर या प्रकरणातील अल्केमिस्ट एआरसी कंपनीचा आलोक धीर हा दुसरा आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. आलोक धीर, आरके कपूर, एसव्ही व्यंकटकृष्णन, ससी मेथाडिल, देवेंद्र जैन, तरुण आणि विजय किशोर सक्सेना यांच्याविरुद्ध जैसलमेरच्या मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले होते.
चौधरी यांना आज (सोमवार) जैसलमेर येथे आणण्यात येणार आहे. हे प्रकरण गोदावन समूहाच्या मालकीच्या मालमत्तेशी संबंधित आहे जिथे २०० कोटी रुपयांच्या मालमत्तांची २४ कोटी रुपयांना विकली गेली होती. कर्जाची परतफेड न केल्यामुळे बँकेने ही मालमत्ता जप्त केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जैसलमेरमध्ये बांधण्यात येत असलेल्या हॉटेलच्या बांधकामासाठी गोदावन समूहाने २००८ मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाकडून २४ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. पण जेव्हा हॉटेल समूह त्याची परतफेड करू शकला नाही, तेव्हा एसबीआयने हॉटेल समुहाचे बांधकामाधीन आणि त्याचे एक चालू हॉटेल जप्त केले होते, त्याला नॉन-परफॉर्मिंग अॅसेट म्हणून वागणूक दिली होती.
त्यावेळी बँकेचे अध्यक्ष प्रतीप चौधरी होते.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २००८ मध्ये गोदावन ग्रुपने स्टेट बँक ऑफ इंडियाकडून हॉटेल बांधण्यासाठी २४ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यावेळी ग्रुपचे दुसरे हॉटेल कार्यरत होते. नंतर, जेव्हा समूह कर्जाची परतफेड करू शकला नाही, तेव्हा बँकेने, नॉन परफॉर्मिंग अॅसेट म्हणून दोन्ही हॉटेल्स जप्त केल्या. प्रतीप चौधरी तेव्हा एसबीआयचे अध्यक्ष होते.
हि हॉटेल्स अल्केमिस्ट एआरसी कंपनीला केवळ २५ कोटी रुपयांना बाजार दरापेक्षा कमी दराने विकल्या. त्यावर आक्षेप घेत हॉटेल समूहाने कोर्टाचा आसरा घेतला. २०१६ मध्ये जेव्हा नवीन कंपनीने हॉटेल्स ताब्यात घेतली तेव्हा त्यांची किंमत अंदाजे १६० रुपये होती. त्यानंतर चौधरी निवृत्तीनंतर अल्केमिस्ट एआरसी कंपनीत संचालक म्हणून रुजू झाले. सध्या मालमत्तांची किंमत २०० कोटी रुपये आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…