मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणावरुन महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगला आहे. ‘राज्यात राजकीय नेत्यांचे टोळीयुद्ध सुरू झालंय. यातून एकमेकांचे कपडे उतरविण्याचे काम सुरू आहे. जनताही यांची मजा घेतेय चाललंय ते चांगलं चाललंय’ असं म्हणत माजी खासदार राजू शेट्टींनी शेलक्या शब्दांत टीका केली.
आज राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी थेट भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा एका ड्रग्स पेडलरसोबतचा फोटो ट्वीट केला आहे. त्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये शाब्दिक युद्ध पेटले आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात पेठ इथं पत्रकारांशी बोलत असताना राजू शेट्टी यांनी आपली भूमिका मांडली.
‘आम्ही मत देऊन ज्यांच्या ताब्यात राज्याचा कारभार दिलाय ते काय लायकीचे आहेत हेच या टोळीयुद्धातून राज्यातील जनतेला कळत चाललंय, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली.
तसंच, आज महाराष्ट्रातील शेतकरी, पाऊसाची अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे अडचणीत आला आहे, त्या शेतकऱ्याला मदतीची गरज आहे अशातच या कष्टकऱ्यांच्या पाठीमागे ना विरोधीपक्ष ना सत्ताधारी उभे राहतात. दोन्ही पक्षांनी शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलंय. शेतकऱ्यांचे मुलभूत प्रश्नाचे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी एकमेकांवर आरोप करत राजकीय टोळीयुद्ध सुरू आहे, अशी टीकाही राजु शेट्टी यांनी केली.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…