एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक हे गेल्या अनेक दिवसांपासून गंभीर आरोप करत आहेत. या आरोपांनंतर वानखेडे कुटुंबीयांकडून सुद्धा पत्रकार परिषद घेत सर्व आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे.
त्यातच आता समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर आणि वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली. यावेळी रामदास आठवलेंनी समीर वानखेडे यांच्या कुटुंबीयांना आपलं समर्थन असल्याचं सांगत नवाब मलिक हे वानखेडे कुटुंबाची बदनामी करत असल्याचं म्हटलं आहे.
वानखेडे कुटुंब हिंदूच
रामदास आठवले यांनी पत्रकार परिषद घेत म्हटलं, नवाब मलिक हे समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांची बदनामी करत आहेत. वानखेडे कुटुंबीय मुस्लीम नाहीयेत. त्यांनी सर्व कागदपत्रे मला दाखवली आहेत. समीर वानखेडे यांच्यावर खोटे आरोप करण्यात येत आहेत. नवाब मलिक हे एनसीपी प्रवक्ते पदाचा गैरवापर करत आहेत. नवाब मलिक यांच्या जावयाला तरूगांत टाकले म्हणून ते हे सर्व करत आहेत असंही रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
प्रभाकर साईलला पैसे दिले
रामदास आठवले म्हणाले, प्रभाकर साईल याला पैसे देऊन त्यांनी विरोधात बोलायला लावले आहे. जर तुमचे काही आरोप असतील तर कोर्टात जा, मला भेटण्यासाठी सगळ्या जाती धर्माचे लोक भेटायला येतायेत. क्रांती रेडकर आणि ज्ञानेश्वर वानखेडे मला आज भेटले, मी या कुटुंबीयांच्या पाठीशी आहे. नवाब मलिक यांनी सुद्धा मला भेटायला यावे.
क्रांती रेडकर या चित्रपटात काम करतात आणि आज एक अभिनेत्री मला भेटायला आल्या आहेत आता मला वाटतंय की, मी पण चित्रपटात काम करावे. काही दिवसांपूर्वी नवाब मलिकांनी म्हटलं होतं की, पिक्चर अभी बाकी है यावर रामदास आठवलेंनी प्रतिक्रिया देत म्हटलं, “पिक्चर बाकी आहे कारण मी अजून पिक्चरमध्ये नाहीये”. पिक्चरमधील नावे बदलण्याचा विषयच नाहीये. हे संपूर्ण कुटुंब खरं बोलत आहेत असंही रामदास आठवलेंनी म्हटलं आहे.
नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांत कुठलंही तथ्य नाहीये. समीर वानखेडे यांच्या विरोधात षडयंत्र रचलं जात असल्याचंही यावेळी रामदास आठवले यांनी म्हटलं.
फ्रॉड कोण आहे लवकरच समजेल
रामदास आठवलेंची भेट घेतल्यावर क्रांती रेडकर म्हणाल्या, आम्ही आज रामदास आठवले यांची भेट घेतली. आम्ही सर्व कागदपत्रे त्यांना दाखवली आहेत. आमच्यासोबत रामदास आठवले आहेत. फ्रॉड कोण आहे हे लवकरच समजेल.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…