लखीमपूरमध्ये केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याने गाडी घातली होती. त्यात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता. त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी ओडीशा येथे काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या ताफ्यावर अंड्याचा मारा केला.
तसेच त्यांना काळे झेंडे दाखवले.
अजय मिश्रा हे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी रविवारी ओडीशाची राजधानी भुवनेश्वर येथे आले होते. मिश्रा हे बीजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळातून बाहेर आले तसे काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर अंडी फेकली तसेच त्यांना काळे झेंडेही दाखवले.
3 ऑक्टोबर रोजी झालेल्या लखीमपूर खेरी येथील भीषण हत्याकांडाने अवघ्या देशात खळबळ उडाली होती. केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर आशीष मिश्राने गाडी घालून चिरडले. त्यात चार शेतकऱ्यांसह आठजणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये एका पत्रकाराचाही समावेश आहे. या प्रकरणी आशीष मिश्रा याला अटक करण्यात आलेली आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…