ताज्याघडामोडी

मोठी बातमी! दिवाळीआधी प्रवाशांना दिलासा, एसटी कामगारांचा संप मागे

दिवाळीआधी एसटी कामगारांनी संप पुकारला होता. त्यामुळे दिवाळीला जाणाऱ्या चाकरमन्यांची धाकधूक वाढली होती. एसटी कामगारांनी जोरदार घोषणा देत संप पुकारला होता. त्यानंतर परिवहनमंत्री यांनी बैठक घेऊन कामगारांच्या मागण्या ऐकल्या. विविध मागण्यांसाठी राज्यभरातील एसटी कामगारांनी पुकारलेला संप अखेर मागे घेतला आहे. 

एसटी कामगार संघटना आणि परिवहन मंत्री यांच्यात बैठक झाली. अखेर या संपावर तोडगा निघाला आहे. एसटी कामगारांच्या मागण्या अखेर मान्य झाल्या आहेत. एसटी कामगारांना २८ टक्के महागाई भत्ता आणि वाढीव घरभाडे भत्ता देण्याची मागणी परिवहनमंत्र्यांनी बैठकीत मान्य केली आहे. 

कामगार संघटनेटी मागण्या नेमक्या काय आहेत?

– एस टी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावं

– राज्य सरकारच्या कर्मचा-यांप्रमाणे दिवाळीपूर्वी 28 टक्के महागाई भक्ता मिळावा

– वाढीव घरभाडे भत्ता मिळावा

– सर्व सणांना उचल म्हणून 12,500 रुपये मिळावेत

– वार्षिक वेतन वाढ 2 टक्क्यांवरून 3 टक्के मिळावी

– कोर्टाच्या आदेशाप्रमाणे ठरलेल्या तारखेला नियमित वेतन मिळावे

– दिवाळी बोनस म्हणून 15,000 रुपये देण्यात यावेत 

परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत कोणत्या मागण्या मान्य?

एसटी कामगारांना 28 टक्के महागाई भत्ता आणि वाढीव घरभाडे भत्ता देण्याचे  मान्य करण्यात आलं आहे. त्यामुळे सहाजिकच 30 कोटी रूपयांचा भार दर महिन्याला एसटी महामंडळावर पडणार आहे. परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासोबतची कामगार संघटनांची बैठक संपली असून अखेर संप मागे घेण्याचा महत्त्वाचा निर्णय झाला आहे. 

बेस्ट कामगार संघटनांसोबतची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलवलेली सह्याद्रीवरही बैठक झाली. या बैठकीमध्ये दिवाळी बोनससह कामगार संघटनांच्या इतर प्रलंबित मागण्यांवर बैठकीत झाली चर्चा झाली. उद्या पुन्हा एकदा कामगार संघटनांच्या नेत्यांसोबत चर्चा होणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय जाहीर करणार आहेत. 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

2 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

2 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago