नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या दिवसातच दिवाळी आहे. या महिन्यातही भरपूर बँक हॉलिडे असणार आहे. साप्ताहिक सुट्ट्यांसह एकूण 17 दिवस बँका पुढच्या महिन्यात बंद राहणार आहेत. दरम्यान पुढील दोनच दिवसात सुरू होणाऱ्या नोव्हेंबर महिन्याच्या पहिला आठवडाच सुट्ट्यांनी भरलेला आहे. 2 नोव्हेंबरपासूनच काही राज्यात सुट्ट्यांना सुरुवात होत आहे. गोवर्धन पूजेची सुट्टी यादिवशी असणार आहे. या आठवड्यात गोवर्धन पूजा, दिवाळी, भाऊबीज इ. सणांमुळे बँका बंद राहणार आहेत.
नेमके तुम्ही जर सुट्टीच्या दिवशी बँकेत गेलात तर तुमच्या कामाचा खोळंबा होऊ शकतो. त्यामुळे त्याआधी कोणत्या दिवशी बँकांना सुट्ट्या आहेत हे जाणून घ्या. या बँक हॉलिडेमुळे तुमच्या बँकिंगविषयीच्या कामात अडथळा येऊ शकतो. अर्थात प्रत्येक राज्यानुसार बँकांच्या सुट्ट्या वेगवेगळ्या असू शकतात. बँक हॉलिडे प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळे असतात, कारण काही सण-समारंभ असे असतात की जे ठराविक राज्यातच साजरे केले जातात.
ज्या राज्यात सुट्ट्या निश्चित करण्यात आल्या आहेत त्याठिकाणी बँकांचे कामकाज बंद राहील. त्यामुळे त्यानुसार योजना आखूनच तुम्ही बँकेमध्ये जा.
RBI ने जारी केलेल्या बँक सुट्ट्यांच्या यादीनुसार, तुम्ही तुमच्या बँकेशी संबंधित कामं लवकरच पूर्ण करा. नोव्हेंबर महिन्याची सुरुवात कन्नड राज्योत्सवाने होत आहे. त्यामुळे 1 नोव्हेंबर 2021 रोजी बेंगळुरू आणि इंफाळमधील बँका बंद राहतील. 7, 14, 21 आणि 28 नोव्हेंबर रोजी रविवारी असल्याने देशभरात बँकांना सुट्टी असेल. त्याचबरोबर 13 नोव्हेंबरला दुसरा शनिवार आणि 27 नोव्हेंबरला चौथा शनिवार असल्याने देशभरातील बँका बंद राहणार आहेत.
तपासा सुट्ट्यांची यादी
1 नोव्हेंबर – सोमवार – कन्नड राज्योत्सव – इंफाळ आणि बंगळुरूमध्ये बँका बंद राहतील.
3 नोव्हेंबर – बुधवार – नरक चतुर्दशीनिमित्त बंगळुरूमध्ये बँका बंद राहतील.
4 नोव्हेंबर – गुरुवार – आगरतळा, अहमदाबाद, बंगळुरू, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, डेहराडून, गंगटोक, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, कानपूर, कोची, मुंबई, नागपूर, लखनऊ यांसारख्या शहरांमध्ये दिवाळी आणि काली पूजनानिमित्त बँका बंद राहतील.
5 नोव्हेंबर – शुक्रवार – गोवर्धन पूजा – अहमदाबाद, बेलापूर, बंगळुरू, गंगटोक, डेहराडून याठिकाणी बँका बंद राहतील.
6 नोव्हेंबर- शनिवार- भाऊबीजनिमित्त गंगटोक, इंफाळ, कानपूर, लखनऊमध्ये बँक कर्मचाऱ्यांना सुट्टी असेल.
7 नोव्हेंबर – रविवारची सुट्टी.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…