मुंबईतील क्रूझ ड्रग्स प्रकरणाशी संबंधित काही लोकांचे मोबाईल सीडीआर आणि प्रभाकर साहील नावाने डुप्लिकेट सीम कार्ड काढण्यासाठी, आपल्याला अलोक जैन आणि शैलेश चौधरी हे दोन जण जळगावात येऊन भेटले.
एवढेच नाही, तर यासीठी त्यांनी आपल्याला 5 लाखांची ऑफरही दिली होती, असा खळबळजनक दावा इथिकल हॅकर मनीष भंगाळे यांनी बुधवारी रात्री पत्रकारांशी बोलताना केला. तसेच, यासंदर्भात आपण मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यासंदर्भात, दाऊदच्या पत्नीशी संभाषण झाल्याचा दावा केल्याने भंगाळे चर्चेत आला होता.
भंगाळे याने नेमका काय दावा केलाय?
जळगावमध्ये 6 ऑक्टोबरला भेटलेल्या अलोक जैन आणि शैलेश चौधरी या दोन व्यक्तींनी माझ्याकडे पूजा दलानीच्या नावाने सेव्ह असणाऱ्या नंबरचा सीडीआर काढून मागितला होता. अलोक जैन आणि शैलेश चौधरी हे दोघे मला भेटले आणि त्यांनी सीडीआर काढून मिळेल का? असे विचारत पूजा ददलानी या नावाने सेव्ह असणारा नंबर दाखवला. एक व्हाट्सएप चॅटचा बॅकअपही त्यांनी मला दाखवला. जो आर्यन खान नावाने सेव्ह होता. क्रूझ ड्रग्स प्रकरणात काहीतरी काळबेर आहे, असा माझा संशय असल्याचे भंगाळे याचे म्हणणे आहे.
5 लाखांची दिली होती ऑफर-
हे काम केले तर तुम्हाला 5 लाख रुपये मिळतील असे म्हणत, त्यांनी मला अॅडव्हान्स 10 हजार रुपये दिले. जाताना त्यांनी मला एक नंबर दिला, जो truecaller वर सॅम डिसुझा या नावाने दिसतोय. त्या दोघांनी प्रभाकर साईल या नावाने सीमकार्ड काढून मिळेल का? असेही विचारले, असा दावाही भंगाळे यांनी केला आहे.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…