पंढरपूर शहर परिसरात सातत्याने मोटारसायकल चोरी घटना घडत असून मागील तीन दिवसात २ मोटारसायकल चोरीस गेल्याची फिर्याद शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.पंढरपूर शहर डीबी पथकाने काही दिवसापूर्वी शहरातील मोटारसायकल चोरीचा कौशल्याने तपास करून ३१ मोटारसायकल ताब्यात घेण्याबरोबरच कर्नाटकातील एका आरोपीसह दोघांना अटक केले होते.या मोठ्या कारवाई नंतर नागिरकांमधून समाधान व्यक्त केले जात असतानाच पुन्हा मोटार सायकल चोरीच्या घटना घडू लागल्याने नागिरकांनी सार्वजनिक ठिकाणी मोटारसायकल लावताना काळजी घेणे गरजेचे झाले आहे.
दिनांक २१ ऑक्टोबर रोजी सुरेखा आदिनाथ भुसारे रा.मोहोळ या मुलासह पंढरपूर सत्र न्यायालयात कामानिमित्त आले असता न्यायालयाच्या आवारात त्यांनी हिरो कंपनीची काऴ्या रंगाची एच.एफ.डिलक्स आर.टी.ओ.नं MH13-CM-4665 ही गाडी पार्क केली.न्यायालयातून काम आटोपून परत आल्यानंतर त्यांना आपली दुचाकी दिसून आली नाही.दिनांक २४ ऑक्टोबर रोजी त्यांनी फिर्याद दाखल केली आहे.
तर दुसऱ्या घटनेत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे सेवानिवृत्त कर्मचारी महादेव भागवत पोळ,वय-63 वर्ष, रा.परदेशीनगर पंढरपुर,दिनांक 24/10/2021 रोजी सकाळी 09/00 वा चे सुमारास मोटार सायकल होंडा शाईन कंपनीची लाला रंगाची आर.टी.ओ.नं. MH13BM2182 घेऊन भाजीपाला खरेदी करण्यासाठी नवीपेठ पंढरपुर येथे आले होते .कबाडे अंडी विक्री केंद्र या दुकानासमोर मोटार सायकल हँण्डल लाँक करुन लावली व भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेले.मात्र परत आल्यानंतर हँन्डल लाँक तोडुन कोणीतरी अज्ञात चोरटयाने मो.सा.चोरून नेल्याची आमची खात्री झाल्याने त्यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.