सांगोला: येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पस – कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चच्या कॉम्प्युटर सायन्स विभागातील मयुरी जाधव या विद्यार्थिनीची एम्फासीस कंपनीमध्ये निवड झाली असून तीला ३.६ लाखाचे वार्षिक पॅकेज मिळाले असल्याची माहिती माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. शेंडगे यांनी दिली.
एम्फासीस हि आयटी सेक्टर मधील अग्रगण्य कंपनी असून हि कंपनी सिक्युरिटी टेस्टिंग, मोबाईल अँड क्लाऊड अँप्लिकेशन टेस्टिंग सह सॉफ्टवेअर व सर्विस पुरविण्याचे काम करते या कंपनी मध्ये निवड प्रक्रियेसाठी क्यू स्पायडर या ट्रेनिंग संस्थे मार्फत ट्रेनिंग दिल्यामुळे विद्यार्थ्यांना कंपनीसाठी आवश्यक असणारे कौशल्य विकसित झाल्यामुळे निवड प्रक्रिये मध्ये फायदा होत असल्याचे प्लेसमेंट अधिकारी डॉ. साहेबगौडा संगनगौडर यांनी दिली.
फॅबटेक अभियांत्रिकी महाविद्यालय हे विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाच्या कंपन्यांमध्ये निवड करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. असे संस्थेचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर . मा. श्री. भाऊसाहेब रुपनर यांनी सांगितले.
निवड झालेल्या या विद्यार्थ्याचे त्यांनी अभिनंदन करून पुढील कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या.यावेळी संस्थेचे कार्यकारी संचालक श्री अमित रुपनर संचालक श्री. दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर बी. शेंडगे, फार्मसीचे प्राचार्य डॉ.संजय बैस, पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. शरद पवार, कॉम्प्युटर सायन्सचे विभाग प्रमुख प्रा. पराग दौन्डे , ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी डॉ. साहेबगौडा संगनगौडर सर्व विभागांचे प्लेसमेंट कॉ-ओर्डीनेटर, सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक आदी उपस्थित होते.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…