सांगोला: येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पस – कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चच्या कॉम्प्युटर इंजिनियरिंग विभागातील रोहिणी खटकाळे या विद्यार्थिनींची अँमडॉक या सॉफ्टवेअर कंपनी मध्ये निवड झाली असून तिला वार्षिक ४ लाखाचे पॅकेज मिळाले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. शेंडगे यांनी दिली…
अँमडॉक हि अंतरराष्ट्रीय कंपनी असून भारताबाहेर अमेरिका, युरोप यासारख्या देशामध्ये या कंपनीचा विस्तार आहे. या कंपनीमध्ये निवड प्रक्रिये साठी क्यू स्पायडर या ट्रेनिंग संस्थे मार्फत ट्रेनिंग दिल्यामुळे विद्यार्थ्यांना कंपनीसाठी आवश्यक असणारे कौशल्य विकसित झाल्यामुळे निवड प्रक्रिये मध्ये फायदा होत असल्याचे प्लेसमेंट अधिकारी डॉ. साहेबगौडा संगनगौडर यांनी दिली..
फॅबटेक अभियांत्रिकी महाविद्यालय हे विद्यार्थ्यांना अव्वल कंपन्यांमध्ये स्थान देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि त्यांची कारकीर्द आमच्यासाठी अधिक मूल्यवान आहे. असे संस्थेचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर . मा. श्री. भाऊसाहेब रुपनर यांनी सांगितले.
या विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर . मा. श्री. भाऊसाहेब रुपनर यांनी अभिनंदन करून पुढील कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या.यावेळी संस्थेचे कार्यकारी संचालक श्री अमित रुपनर, श्री. दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर बी. शेंडगे, फार्मसीचे प्राचार्य डॉ.संजय बैस, पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. शरद पवार, कॉम्प्युटर सायन्सचे विभाग प्रमुख प्रा. पराग दौन्डे,ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी डॉ. साहेबगौडा संगनगौडर सर्व विभागांचे प्लेसमेंट कॉ-ओर्डीनेटर, सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक आदी
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…